नालासोपारातील झमाझम मार्केट विरोधात रास्तारोको

वसई (वार्ताहर) : नालासोपारातील अनधिकृत झमाझम मार्केट विरोधात बविआ, शिवसेना आणि मनसेद्वारे रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

नालासोपारा पुर्वेकडे असलेली सामवेदी ब्राम्हण संघ ही जुनी इमारत धोकादायक असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने १ जुन २०१९ रोजी निष्काषीत केली होती. त्यानंतर मोकळया झालेल्या जागेवर पत्र्याचे कुंपण घालण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारी २०२० ला जैसे थे चे आदेश दिलेले असताना या जागेवर झमाझम नावाचे मार्केट सुरु करण्यात आले आहे. या मार्केटमध्ये अनधिकृत टपऱ्या उभारण्यात आल्या असून, प्रत्येक टपऱ्यांचे दरमहा १५ हजार भाडे आकारण्यात येत आहे. मुळ रहिवाशी बेघर झालेले असतानाही, या मार्केटद्वारे धंदा करण्यात येत आहे.

त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसह परिसरातील नागरिकांना चोरी,आरोग्य, अवैध्य धंदे यांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या बाजारात अंमली पदार्थांची विक्री करण्याचाही धोका निर्माण झाला आहे. या बाजारात टपरीवाले वापरत असलेल्या ज्वलनशील उपकरणांमुळे आग लागण्याची आणि स्फोट होण्याचीही भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्केटवर कारवाई करण्याची मागणी मनसे, शिवसेना, बहुजन विकास आघाडी आणि स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र,या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे रविवारी ८ मार्चला या माकर्ेटसमोर रास्ता रोको करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!