नालासोपारा येथे राष्ट्रीय समाज पक्षा तर्फे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

नालासोपारा : स्वामी विवेकानंद यांनी आपल्या  जीवनात त्यागाची व समर्पित वृत्तीची भावना जोपासली सर्व जाती-भेदाचा अंत होऊन समता बंधुता चे नाते माणसामाणसात निर्माण होण्याचा दूर्दम्य आशावाद त्यांच्याकडे होता.
अशा ह्या दूरदृष्टी असलेली महापुरुषांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत व ही जयंती महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात साजरी राष्ट्रीय समाज पक्ष करणार आहे तसेच आमचे प्रेरणास्थान माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामस्वामी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदी महामाता आणि महापुरूष यांची जयंती आपण करतोच त्याचप्रमाणे जाज्वल्य राष्ट्राभिमान बाळगणारे आणि अमेरिकेतील शिकागो येथील धर्मपरिषदेतील इतर वक्त्याप्रमाणे लेडीज अँड जेटेलमेंट न म्हणता विवेकानंदानी ब्रथर्स अँड सिस्टर्स अशा शब्दात भाषणाची सुरुवात करून सभागृहातील उपस्थित श्रोत्यांची मने जिंकून घेतली व हे विश्वची माझे घर ही संकल्पना जगासमोर मांडली आणि अशा ह्या निर्मळ व सम्पूर्ण जगाला आपल्या हुदयात सामावलेल्या व्यक्तिमत्वाची जयंती देशभरातून साजरी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून करण्याचा मानस राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पशु दुग्ध व मत्स्यपालन मंत्री यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले . तसेच राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यातील व इतर राज्यात उत्तम प्रगती होत असून पक्षात सदस्यत्व वाढत आहे त्याचप्रमाणे राज्यात व राज्याबाहेर नगरसेवक, अध्यक्ष, सभापती आदी पक्षीय बलाबल संख्या वाढत असून दुसऱ्या टर्म लाही NDA सरकार येणार व राज्यात व केंद्रात मंत्रीपद व जनतेची अधिक प्रकारे सेवा करण्याची संधी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला येणारे हे वर्ष इलेकशन चे असून नव्याने बुथरचना निर्माण करणे आवश्यक आहे त्यासाठी पालघरचे तरुण तडफदार व पूर्ण कार्यक्षमतेने काम करणारे जिल्हाध्यक्ष दीपक चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनतेपर्यत जाण्याच्या सूचना केल्या तर राष्ट्रीय महासचिव अक्की सागर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रित्यर्थ स्वामी विवेकानंदाचे विचार ह्या देशातील युवा वर्गाला केंडस्थानी ठेऊन शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन देशाला व समाजाला पुढे नेऊ शकेल असा विश्वास आपल्या भाषणातून व्यक्त केला.

सदर, कार्यक्रम नालासोपारा पूर्व संतोषभवन येथील पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र चौधरी यांच्या कार्यलया च्या उदघाटन प्रसंगी दुग्ध, पशुसंवर्धन व मत्स्योत्पादन मंत्री श्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले यावेळी महासचिव श्री अक्की सागर ,दक्षिण भारतातील प्रभारी श्री प्रसन्न आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती ह्यावेळी मंत्री महादेव जानकर यांच्या साक्षीने पक्षात प्रवेश घेतला तसेच आदी मान्यवर मंडळी आणि हजारो नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी      आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पाल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!