
नालासोपारा (प्रतिनीधी) : शहराच्या पश्चिमेस आता पोलिसिंग कार्यपद्धती बदलत्या काळानुसार बदलत आहे. संपूर्ण वसई तालुका आता पोलीस आयुक्तालय क्षेत्रात समाविष्ट असल्याने एकूण कार्यपद्धती व क्षमतेत काही बदल होतील असे अपेक्षित होतेच. आपल्या विभागाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या संकल्पनेतील “एक कॅमेरा शहरासाठी” योजना नालासोपारा पोलीस स्टेशन हद्दीत यशस्वी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याच योजनेचा एक भाग म्हणून काल वसई परिमंडळ दोन चे उपायुक्त संजयकुमार पाटील आणि उपायुक्त अमोल मांडवे या
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नालासोपारा शहराला भेट दिली.
या दौऱ्यात नालासोपारा पश्मिम भागात ७ ठिकाणी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेरा सुविधेचे उदघाटन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक भोये, बहुजन विकास आघाडी पक्षाचे प्रभारी नेते हेमंत म्हात्रे हे मान्यवर सुद्धा त्यांच्या समवेत होते. “पहिला अत्याधुनिक कॅमेरा” सिव्हिक सेंटर चौकात. हिक व्हिजन कॅमेरा महाग असतो. मात्र हा कॅमेरा इतका प्रभावी आणि तीक्ष्ण असतो की धावत्या वाहनांचा नंबर दूरवरून टिपू शकतो. व्यक्तिचा चेहरा अधिक ठळकपणे दाखवू शकतो. (ऑटो नंबर प्लेट रेकक्नाईझर) शहरा साठी हा एक कॅमेरा सेट येथील उद्योजक ताराचंद विकमाणी, छाया विकमाणी, प्रभाग समिती कार्यरत सभापती अतुल साळुंखे यांच्या सौजन्याने उपलब्ध करुन देण्यात आला.
एस.टी.डेपो रोडचा डेपो टर्न (सौजन्य भा.ज.पा.नेते राजन नाईक) हनुमान नगर परिसरात मुख्य चौकात चार कॅमेरा सेट
(सौजन्य – नगरसेविका सुषमा दिवेकर), छेडा नगर स्टाॅप येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात. (सौजन्य – नागोरी डेअरी) फन फिएस्टा चौकात (सौजन्य – नविन वाघचौडेे), फन फिएस्टा थिएटर जवळील वाघोबा मंदिर येथे (सौजन्य-वाघोबा मंदिर मित्र मंडळ,निळेगाव), यववंत गौरव – रिद्धि विनायक हाॅस्पिटल रोडवरील मुख्य चौकात (सौजन्य-नगरसेविका शुभांगी गायकवाड आणि कार्यकर्ते गणेश पाटील), यशवंत गौरव – नव निळेमोरे लिंक रोडवरील चौकात. (सौजन्य – कार्यरत प्रभाग सभापती किशोर पाटील), निळेगाव गावदेवी मंदिराजवळ (सौजन्य – किशोर पाटील), आणखी काहीजणांनी असेच सहकार्य करण्याचे या दरम्यान जाहीर केले आहे.
पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील आणि उपायुक्त अमोल मांडवे यांनी या वेळी बोलताना लोक वर्गणीतून लोक सुविधा ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जे जे पुढे आले आहेत आणि जे येणार आहेत अशा सर्वांचे आभार मानले.
शहरांच्या विकासासाठी धाऊन येणारे लोकप्रतिनिधी, उद्योजक आम्ही येथे बघितले, समाधान झाले. आता आमच्या निगराणीच्या कक्षा रुंदावल्या आहेत आणि आम्ही अधिक चांगले गतिमान पोलिसिंग देवू शकतो. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रम कोणताही असो नागरिक व कार्यकर्त्यांनी आणखी काही दिवस गर्दी टाळावी असे आवाहनही त्यांनी केले. लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची रक्षा करणे,निगा राखणं हे काम सुद्धा आपले सर्वांचे आहे. असे आवाहन व.पो.नि.वसंत लब्दे यांनी समारोप सोहळ्यात बोलताना केले.

पोलीस आयुक्तांच्या या “तिसरा डोळा उपक्रमात” समन्वयक म्हणून उत्तम कामगिरी बजावत असलेल्या ज्ञानेश्वर माचेवाल या पोलीस अधिकाऱ्यांनाही सभापती अतुल साळुंखे, किशोर पाटील यांनी सन्मानित केले. ब.वि.आ.चे पदाधिकारी नरेश जाधव, मिलिंद शिंदे, विवेक पाटील, संजय साॅंवला, संजय भंडारी, चेतन पाटील, चेतन देशमुख, उमेश दिवेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उदघाटन सोहळ्यात छाया ताराचंद विकमाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, शहर विकासासाठी जातीने लक्ष देणारे लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर, युवा नेते आम.क्षितीज ठाकूर, पहिले महापौर राजीव पाटील, पोलीस आयुक्त सदानंद दाते यांचे आभार मानले. सामाजिक कार्यात सहभागी व्हायची आणि खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली.
या साखळी कार्यक्रमांतील उदघाटन न समारोप सोहळ्याचे सूत्रसंचलन ब.वि.आ.चे शहर उपाध्यक्ष अड.रमाकांत वाघचौडे यांनी केले. सभापती अतुल साळुंखे व किशोर पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.