नालासोपारा शालेय महोत्सव कला-क्रिडा विभागात कमालीची चुरस

नालासोपारा (प्रतिनिधी) : २० व्या नालासोपारा शालेय कला-क्रीडा महोत्सवात काल कला विभागात काही स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या. कला विभागातील फैन्सी ड्रेस, वैयक्तिक गायन, वैयक्तिक अभिनय, समूह गायन, वैयक्तिक नर्तन या स्पर्धांमध्ये शाळा आणि विद्यार्थी पुरेशा तयारीने उतरले आहेत.

तुळींज के.एम.पी.डी.विद्यालयात या कला विभागाच्या स्पर्धा चालू आहेत. के.एम.पी.डी.विद्यालय, नूतन विद्यालय, सरस्वती विद्यालय, लोकमान्य, इंग्लिश हायस्कूल सोपारा, लिटिल फ्लॉवर स्कूल, कांचन हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा आचोळे, राजा शिवाजी विद्यालय, मदर मेरी हायस्कूल ई.शाळांच्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी समूह गायन, वैयक्तिक अभिनय, वैयक्तिक गायन स्पर्धेत चांगले सादरीकरण केले आहे.

स्पर्धा प्रमुख रमाकांत पाटील, दिनेश शिंदे, किरण राऊत यांनी या स्पर्धांची जबाबदारी सांभाळली. ज्येष्ठ रंगकमीं र्रमेश पाटील (भाईंदर) कल्पिता तळपदे, विवेक पर्वते, वैशाली शिर्के, व्रिशाली जोशी यांनी परिक्षक म्हणून कामकाज पाहिले. या स्पर्धेत विजेते ठरलेल्या स्पर्धकांना आज रात्री होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

  कबड्डीला दांडगा प्रतिसाद

२०  व्या नालासोपारा शालेय कला -क्रीडा महोत्सवात क्रीडा विभागात कबड्डीच्या संघांनी यंदा विक्रम केला आहे. १५० संघ विविध वय व वजनी गटात या स्पर्धेत भाग घेत आहेत. सकाळी विविध अंतराच्या धावणे स्पर्धा सुरु झाल्या. आणि दुपारनंतरच्या सत्रात कबड्डी आणि खो खो संघ मैदानात उतरले आहेत. कबड्डी या क्रीडा प्रकाराला शहरातील शाळांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

 नालासोपारा पश्चिमेला पोलीस स्टेशन मागे असलेल्या पालिकेच्या मैदानावर या क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. याच कबड्डी स्पर्धेत काही वर्षांपूर्वी गोंधळ घातला जायचा. आता तो होत नाही. ही खबरदारी पालिकेने घेतली आहे. कबड्डी स्पर्धेत झेड.बी.झकेरिया, सोपारा इंग्लिश हायस्कूल, लिटिल फ्लॉवर स्कूल,नूतन विद्यालय,राजा शिवाजी विद्यालय,कांचन हायस्कूल, लोकमान्य हायस्कूल, स्व.राजीव गांधी विद्यालय,सरस्वती विद्यालय, के.एम.पी.डी. विद्यालय, मोरेश्वर हायस्कूल, कपोल हायस्कूल या शाळांच्या संघांनी आपले सर्वोत्तम संघ या स्पर्धेत उतरवले आहेत.

 क्रीडा विभाग प्रमुख प्रा.माणिकराव दोतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक संदीप पाटील आणि सहकारी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.  प्रभाग समिती सभापती अतुल साळुंखे, माजी नगरसेवक नरेश जाधव हे या विभागावर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!