नालासोपाऱ्यातील तीन मजुरांच्या नातेवाईकांना खासदार राजेंद्र गावित यांची आर्थिक मदत

नालासोपारा : नालासोपारा शहरातील निळेमोरे गावातील आनंद व्ह्यू सोसायटीमध्ये सेफ्टी टँक साफ करण्यासाठी मैला साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा शुक्रवारी विषारी वायुमुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या नातेवाईकांच्या घरी खासदार राजेंद्र गावित यांनी जावून सांत्वन करून यांनी स्वतः रोख रक्कम देवून कुटुंबियांना दिलासा दिला आहे.

मयत झालेल्या मजुरांची मुलेबाळे,पत्नी यांचा संसार रस्त्यावर आला असून त्यांना दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन केले होते. त्याची दखल घेवून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी वसईतील गोखीवरे देवीपाडा येथे जावून पिडीत कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे,प्रवीण म्हाप्रळकर,दिवाकर सिंग,राजू म्हात्रे, भारतीय वाल्मिकी धर्म समाज चे महाराष्ट्र अध्यक्ष पवन बिडलान,अजित वैती यांच्यासह अनेक शिवसैनिक व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.बिल्डरांनी केलेल्या हलगर्जीपणाचे तीन बळी गेले असून त्यांचा संसार उघड्यावर पडला असून मजुरांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा कमावता व्यक्ती गेल्याने त्यांचा आधार नाहीसा झाला असून वाल्मिकी समाज बांधवांसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून वसई विरार महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे हे बळी गेले असून संबधितांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे.मात्र या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे.या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून त्यांना शक्य तितकी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.एक सामाजिक बांधिलकी म्हणून जेजे शक्य होईल तेते इन्शुरन्स पॉलीसी असेल, महानगरपालिकेत जेजे कंत्राटी पद्धतीवर वाल्मिकी समाज जो काम करतो आहे.त्यांना कायमस्वरूपी पद्धतीने कशाप्रकारे घेता येईल आणि त्याचे जेकाय प्रश्न असतील.ते प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी गुरुवारी १२ वाजता वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांच्याशी चर्चा करून कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!