
वसई (वार्ताहर) : वसई-विरार महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना काही दिवसांपूर्वी ट्रेड लाइन्स हा कर लावला होता त्यासंदर्भात भाजपा मोठ्याप्रमाणात आक्रमक झाली होती. याबाबतीत भाजपाने वसईमध्ये व्यापाऱ्यांशी बैठक करून हा कर रद्द करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. याबाबतीत भाजपाने एक पत्रककडून प्रत्येक व्यापाऱ्याचा या करास विरोध असल्याची स्वाक्षरी मोहीम राबवली होती. या पार्श्वभूमीवर होणारा विरोधपाहता महापालिकेने या करात ५० टक्के सवलत दिली आहे. परंतू भाजपा यावर समाधानी नसून याबाबतीत भाजपाचे जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी कठोर शब्दात विरोध केला आहे.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, पूर्वी विरार व आज ठाण्यातून वसई-विरार महानगरपालिका चालत आहे एक पक्ष कार्यलयाप्रमाणे कामे केली जात आहे. करून घेतली जात आहेत. ही ह्या प्रकारचा पायंडा पडणे म्हणजे भविष्यात महानगरपालिकेवरचा जनतेचा विश्वासच उडून जाईल अशी एकंदरीत परिस्थिती आहे. सत्तेत असताना बहुजन विकास आघाडी कर लावणार सत्ता गेल्यावर शिवसेना तो अमलात आणणार हा पोरखेळ दोघांनी लावला असून येणाऱ्या निवडणुकीत ठाणे आणि विरार दोघांना घरी बसवल्याशी वसईची जनता शांत बसणार नाही. ५० टक्के कमी केल्याचे जे गाजर महापालिकेने दिले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो मुळात जो कर कुठेच नाही तो आम्ही का भरायचा? असा सवाल यावेळी त्यांनी केला.
लवकरात लवकर लावलेला हा जाचक कर महापालिकेने तात्काळ रद्द करावा नाहीतर भविष्यात आम्ही आयुक्तांना घेराव घालून याचा जाब विचारू असे यावेळी ते म्हणाले.