निर्मळच्या यात्रेवर अंकुश ठेवण्याची पोलीसांकडे मागणी

वसई (वार्ताहर) : ऐतिहासिक आणि पौराणिक र्महत्व असलेल्या निर्मळच्या यात्रेत चालणाऱ्या बेकायदा धंद्यावर अंकुश ठेवण्यात यावा, अशी र्मागणी पर्यावरण सर्मितीने पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

आद्यगुरु शंकराचार्य सर्माधी र्मंदिर निर्मळच्या यात्रेला 1डिसेंबरपासून सुरवात होत आहे. भगवान परशुरार्म आणि विमलासूर राक्षसामध्ये झालेले तुंबळयुध्द आणि त्यात परशुरामाने विमलासूराचे धड आणि शिर वेगळे करून निर्माण केलेले विर्मळ आणि निर्मळ तलाव, अशी पौराणिक महती निर्मळच्या यात्रेला प्राप्त झाली आहे. अशा निर्मळच्या यात्रेला वसई तालुक्यासह भिवंडी, पालघर, डहाणूसह मुंबईतील हजारो भाविकही दरवर्षी येत असतात.सायंकाळी 4वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ही यात्रा सुरु असते.

आकाश पाळण्यासह अनेक मनोरंजनार्त्मक खेळ,खाद्य पदार्थ,खेळणी, गृहपयोगी वस्तु,  मिठाई, भाज्या,  मसाले,  लोणची,पापड या यात्रेत उपलब्ध होत असल्यामुळे मनोरंजनासह खरेदी करण्यासाठी दररोज हजारो भक्तांची आणि पर्यटकांची या यात्रेला गर्दी असते. या गर्दीची संधी घेवून खिसेकापु,मोबाईल चोर आणि जुगारी आपपले उखळ पांढरे करून घेत असतात. अशातच निर्मळ-कळंब रस्त्यावरील पोलीस चौकीही गेल्या कित्येक र्महिन्यांपासून बंद पडली आहे.त्यार्मुळे चोरटयांचे चांगलेच फावणार आहे. म्हणून ताबडतोब उपाययोजना करण्यात याव्यात, अशी र्मागणी पर्यावरण संवर्धन सर्मितीचे निमंत्रक सर्मीर वर्तक,व ाघोलीचे र्माजी सरपंच टोनी डाबरे, मायकल कोरीया, आग्नेको दोडती आणि दर्शन राऊत यांनी पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!