निवडणूक आयोग भाजपा, आरएसएस चे बाहुले – आ.चव्हाण

वसई (वार्ताहर) : ईव्हिएम मशिनच्या पुराव्यासह असंख्य तक्रारी असतानाही निवडणूक आयोग दुर्लक्ष करीत असल्याचे नमुद करून निवडणूक आयोग भाजपा आणि आरएसएसच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप आमदार विद्या चव्हाण यांनी विरारमध्ये केला.

मैत्री संस्था,सद्भावना संघ आणि लेक लाडकी अभियानने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रशिक्षण शाळेचे रविवारी रात्री आमदार विद्या चव्हाण यांच्या हस्ते उद्धाटन झाले.विरारच्या श्रीमंगल हॉलमध्ये झालेल्या या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी समाजसेवक गंगाधर म्हात्रे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सद्भावनाच्या सहसंयोजक वर्षा विद्या विलास,दर्शना नामदे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक,जिल्हाध्यक्षा मनिषा उके,सत्यमेव जयतेचे संपादक अमोल मडामे,राजेंद्र भिसे यांच्यासह अनेक मान्यव उपस्थित होते.

यावेळी विद्या चव्हाण यांनी सरकारवर टिका केली.पुर्वीचे मंदिर-मस्जिद वातावरण पुन्हा तयार केले जात आहे.शंभर रुपयांना भाज्या विकल्या जात असतानाही शेतकऱ्यांच्या पदरात एकही रुपया पडत नाही.त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.पसंतीचा जोडीदार निवडला म्हणून तरुणींना भर रस्त्यात मारलं जातंय.कोणतेही बटण दाबले तरी कमळाला मत जाते.अशा तक्रारी असतानाही दुर्लक्ष करुन निवडणूक आयोगाने आपण भाजपा आणि आरएसएसच्या हातातील बाहुले असल्याचे दाखवून दिले आहे.अशी आमदार चव्हाण यांनी सरकारवर टिका केली.

तसेच सद्यकाळात समाजाची जाण ठेवण्याचे प्रकार कमी झाले आहेत.अशावेळी मैत्रीचे अध्यक्ष सुरज भोईर यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची शाबासकीही त्यांनी यावेळी दिली.तर आपल्यातील कमतरता दुर करण्यासाठी सार्यकर्ता प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.प्रशिक्षणातूनच कार्यकर्ता परिपक्व होतो.असे मडामे यांनी यावेळी स्पष्ट केले.सोहळयाचे प्रास्ताविक करताना सुरज भोईर यांनी कार्यकर्ता प्रशिक्षणाची माहिती देताना ते का आवश्यक आहे.हे यावेळी स्पष्ट केले.या शिबीरातून आतापर्यंत पंधराशे कार्यकर्ते तयार झाल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!