निष्ठावंत भाव भक्तांचा सर्वधर्म निर्धार हे वर्म चुकों नये 

सुंदर हे ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया l

तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचि ध्यान l

मकरकुंडले तळपती श्रावणी कौस्तुभमणी विराजित l

तुका म्हणे माझे हेचीं सर्वसुख पाहिन श्रीमुख आवडीने ll

बालयोगी सदानंद महाराज हे महाराष्ट्रातील संत. वयाच्या १२ वय वर्षी तपोवनी बसून संत परंपरा जपली. तुंगारेश्वर पर्वतावर चैतन्य निर्माण झाले. वडील श्री.वैजनाथ पाटील यांनी छोटेसे मंदिर व पूर्ण कुट्टी उभारली, कालांतराने आश्रमात रूपांतर झाले. बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहे. भक्तिमार्गातून शांतीपाठाचे धडे भजन, कीर्तन व ज्ञानेश्वरी पठणाद्वारे मिळत असतात. वनदेवीच्या सहवासात आल्याने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हणत संसारापासून अलिप्तता:  स्वीकारली. करोडो रुपयाच्या जमीनजुमला व घरादारावर तुळशीपत्र वाहिले. मौन तपधरणेस बसले. ‘जे का रंजले गाजले त्यांसी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा’ गरिबांचे एक गरिंबनवाज झाले. आत्मज्ञानाच्या प्रगती करीता ‘ब्रह्मादिपीका’ ग्रंथाची निवड केली. ज्ञानेश्वरी माथ्यावर घेऊन भारत व परदेशी भ्रमण केले. देवाचे नाम अखंड कंठात जपत ह्यांचासारखी दुसरी भक्ती नाही.

देव अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला l

विठोबासी शरण जावे निच निष्ठेने नाम घ्यावे ll

मानवी जीवनाचा आधार ही परमेश्वर श्रध्दा आहे, याच्या डोळसपणे स्विकार केला. मायाब्रह्माचे विवरण गृह्य उलगडण्याचे महानकार्य आश्रमाद्वारे घडविले जाते. ज्ञानेश्वरीच्या प्रचारप्रसाराचे कार्य संतच हाती घेत असतात. पण कोणा एका पामराला ते पहावले नाही. पामराने नि:शकता घ्यावी हे योग्य ठरले नाही. एकां विभूती  योगेन युत्र्यते नात्र शंशया.

संताबद्दल तुम्ही निश:के केला तो त्रिशुध्दी जाहला. त्यांना असे वाटले असावे की संतास वैफल्य येईन पण तसे काही घडले नाही. काडीकाडी करुन भक्तांनी उभारलेला आश्रम पापणी लवते न लवते तोवर हजारो भक्तांच्या डोळयादेखत उध्द्वस्त केला. भक्तांच्या डोळयातील दु:खाश्रू पाहून आसुरी आनंद उपभोगला जाणू. पण ज्यांच्या अंगी पुरुषोत्तम नाही असे करंटे ते निपजले.

नामा म्हणे धन्य जन्म जया पंढरीचा नेम l

तया अंती पुरुषोत्तम जीवे माने न विसंबो l

चिऱ्ति अखंड विठ्ठलप्रेम ते धन्य भू मंडळी ll

परमेश्वर नामचिंतन हेच जीवनाचे सार असून संतोच हे सिध्दांत त्रिकालबाधीत सत्य आहे. सार भगवंताचे नामभिध्यान बाकी सगळे असार आहे. वाचेने अखंड हरिनामाचा उच्चारकर,

सार सार विठोबा नाम तुझे सार l

महणऊनी शळपाणी जपतसें वारंवार ll

”नित्यानंद गुरु तुझ्या पादुका वंदनी मी माथा” आई-वडीलांच्या मुखी भजन व पवित्रता त्यांचा हा योगपुत्र अश्या संताची तपसाधना भंग करावी त्यांना कळवावे ह्या सारखे दुसरे पातक नाही. मुख्यमंत्री दर्शनास आले असता स्वत: म्हणाले ”आश्रमाची राहिलेली कायदाने परिपूर्णता मी करणे हा माझा शब्द आहे.;; पण त्यांचे ही सरकारपुढे काही चालले नाही. ‘बोले तैसे चाले त्यांची वंदावी पाऊले’ हे निवडणुकी करता घेण्यापुरतीचे बोल होते. ५० वर्षे सरकार दरबारी नोंदणी असून आश्रमावर घाला घालावा हे योग्य झाले नाही.

पूर्णकर्म जनांत होत l संत दर्शन त्यांच्या ठाई l

होतसे लावलाही यात संशय नसे ll

१ मे १९७१ साली पर्वतावर बाबांचे आगमन झाले तेव्हा येथे काहीही नव्हते. संत हेच स्वयंभू महापुण्यक्षेत्री निवास करतात. संतापासून श्वापदानाही अभय असते. श्वापदांमध्ये दृष्टीबुध्दीभावना नसते तर ती केवल मानवप्राण्यात असते. बाबांचे अलौकीककार्य करमठांच्या डोळयात खुपू लागले. किर्ती कानावर शोशवेनाशी झाल्याने अंतरी अहंकाराचा राक्षस जागृत झाल्याने आसूरता निर्माण झाली. सुडाचा उद्रेक मनी उगवल्याने हे पातक घडले. पण त्यांनी बाबांचा त्याग पाहिला नाही, कोमळ ह्दय पाहिले नाही, झोपावयास जमीन उषास धोंडा, खावयास कंदमुळे-नवस्पती, पिण्यास झराचे पाणी, जंगलातील गारठणारी थंडी, डोक्यावर छप्परही नव्हते ते त्यांना कधीही दिसले नाही. ‘ठेविंले अनंते तैसेची रहावे चिऱ्ती असावे समाधान’ हीच संताची योगसाधना असते. माणसांच्या वाईट विचार हा त्यांचा ठाईभाव असतो तो चटकन मनात येतो रामदासस्वामी स्थायीभाव म्हणतात,

मना वासना दृष्ट कामा न ये रे l

मना सर्वथा पापबुध्दी नको रे l

मना धर्माता निति सोडूं नको हो l

मना अंतरी सार विचार राहो ll

हा विचार सोडला की माणूस अधर्ममानी वागता.

कोणाचीही उपेक्षा, द्वेश अथवा टीकास्त्र बाबांनी कोणावरही सोडला नाही. अश्या तपश्वीना त्रास देणे हे उचित नव्हे. भक्तांनी भक्तिभावाने उभारलेला हा श्रमिकआश्रम होता. ह्यांस हात घातल्याने बाबांना अंतोनात दु:ख दिले पण ते सावरले, पुन्हा कार्यरत राहण्याकरिता भक्तिमार्ग चाखाळून भजन कीर्तनी दंग झाले. ज्ञानेश्वरी वाचनास सुरुवात झाली हात दीप तेवतच राहणार तो अनंतकाळा पर्यंत, हा नंदादीप भक्तीचा कदापीही मालवून देणार नाहीत हेच विधायक कार्य संत करत असतात. ग्रंथराज श्री.ज्ञानेश्वरी सामुदायिक परायणाचे हे ४२ वर्ष आहे असचे अनंतकाळ चालूच राहणार.

वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी l

 ज्ञान व अज्ञानाशी ऐसावर मा डिकेसी l

ज्ञान होय मुढा अतिमुर्ख दगडा l

वाचिल जो कोणी जनी त्यांसी लोटांगणी ll

जगभर अनेक नामवंतोच कौतुक होत असते पण संत स्वत:च्या कौतुकाची मागणी केव्हाही करत नाहीत म्हणून संत ओळखण्यास उशीर लागतो, दिव्यदृष्टी आम्हापाशी नसते ती जर माणसापाशी असती तर पांडवांना भगवान श्रीकृष्ण ओळखता आले असते.

 न तू मां शकरा से द्रष्टुमने व स्वत:च क्षष्मा l

दिव्य ददमि ते चक्षु: पश्य में योगमैश्वरम ll

सालाबादाप्रमाणे बाबांची भक्तीसमवेत तुंगारेश्वर पर्वत ते स्वामी नित्यानंद मंदिर प्रांगणात पर्यंत दिडी निघाली. नामाचा जयघोष आसमात दुमदुम लागला अभंग जयघोष झाला

१. चला आळंदीस जाऊ ज्ञानदेवासं डोळा पाहू

२. जन्म नाही रे अनेकदा

३. ज्ञानदेव माऊली ज्ञाणराज माऊली संताची सावली.

४. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे हजारो अभंग कंठीगात दिडी गणेशपुरीत विसावली

सामुदायिक पारायणास कोणताही केव्हाही खंड पडणार नाही. २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१९ पर्यंत हे पारायण होणार आहे. ह.भ.प श्री.पुरुषोत्तम म्हात्रे महाराज (नायगाव) यांच्या मुखातून ही सरस्वतीवाणी श्रावणात भक्तांना मिळणार ही अमृतधारा महाराज आतीसोप्या भाषेतून सांगतांना जी एैकावयास मज्जा असते ती काही औरंच असते. तसेच ज्ञानेश्वरीच्या गाढया अब्यासिक ह.भ.प सर्वेधरताई भिंसे शेगांव ‘श्री.भगवत कथा ज्ञानतज्ञ’ सांगणार आहेत. दररोज भजन, हरिपाठ महाराष्ट्रातील नामवंतांची कीर्तने अशी अनेक पारायणाची वैशिष्टे. 50 हजार भाविकांचाही महाराष्ट्रातून पारायणास नाशिक (त्रंबकेश्वर) येथे वारकरी संप्रदाय जमणार आहे. असे समाज जागृतीकार्य संतच करू शकतात. मनोजय हाच परमार्थ आहे. गीतेच्या चौथ्या अध्यायातील चौतिसव्या श्लोकात माऊली म्हणतात.

तद्विध्दी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया l

उपदक्ष्यंति ते ज्ञान ज्ञानिनस्तऱ्त्व दर्शन ll

संताकडुन ज्ञान मिळते म्हणजेच आत्मज्ञान मिळणे हे आत्मज्ञान अज्ञानाचे वलय अच्छादून बाजूस सारणे होय आत्मज्ञान हा अनुभूतीचा विषय आहे, भक्तहाच देवाशी एकरुप असतो म्हणुन भक्तांसाठी देव पु:न्हा उभा टाकला.

निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकोइ नये l

निष्काम विश्वळ विठलीइ विश्वास पाहोइ नये वास अणिकांची l

तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ll

ll बाबाराम ll

लेखक : जगदीश रघुनाथ भोईर (बोरीवली पूर्व, मुंबई)

मो : ९८३३७१४८३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: