परिवहनच्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी – नरेश पुलीपाटी

वसई (वार्ताहर) : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रात परिवहनच्या बसेस सूरू होऊन पांच ते सहा वर्षे झाली. आपली महानगर पालिका परिवहनच्या बसेस संपूर्णपणे ठेकेदारी पध्दतीने चालवित आहे. या सर्व बसेसची एकंदरीत अवस्था पाहिली तर असे दिसून येते की या बसेसची व्यवस्थीत निगा (मेंटेनन्स) राखला जात नाही. परिवहनच्या बसेसच्या क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवाशी बसमध्ये भरले जातात. परिवहनच्या बहुतेक सर्व बसेसमधून प्रचंड प्रमाणात धूर निघत असतो. या धूरामुळे हवेत व रस्त्याच्या परिसरात मोठया प्रमाणात प्रदुषण होत आहे. परिवहनच्या बसेसमधून निघणाऱ्या धूरामुळे नागरीकांना श्वसनाचे त्रास सूरू झालेले आहेत. या बसेस अनेक वेळा भर रस्त्यात बंद पडतात त्यामुळे वाहतुक कोंडी होत असते. परिवहनच्या बसेसचे वाहक (ड्रायव्हर) नशा किंवा दारू पिऊन बसेस अतीवेगाने चालवित असतात. या त्यांच्या बेदरकार बसेस चालविण्यामुळे भर वस्तीत अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या व नागरीकांच्या जिविताला धोका असून आता पर्यंत झालेले अपघात व जिवितहानी ही केवळ परिवहनच्या बसेसच्या वाहकांच्या (ड्रायव्हर) निष्काळजीपणामुळे झालेली आहेत. या बसेसमधून प्रवास करणारे प्रवासी व रस्त्यावरून चालणारे नागरीक परिवहनच्या बाबतीत अनेक तक्रारी करीत आहेत.

या सर्व बसेसमुळे सामान्य नागरीकांना होणारा त्रास तसेच परिवहनच्या बसेसचे वाहक (ड्रायव्हर) यांच्या निष्कळजीपणामुळे प्रवाशांना होणारा त्रास व त्यांच्या जिविताला निर्माण झालेला धोका अशा प्रकारच्या अनेक लेखी तक्रारी घेऊन महाराष्ट्र शिववाहतुक सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष विनायक निकम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शिववाहतुक सेनेचे वसई तालुका अध्यक्ष नरेश पुलीपाटी यांनी महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परिवहनच्या ठेकेदारावर या बाबतीत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी सेनेचे विरार अध्यक्ष धनंजय कांबळे, संतोष भूवनचे विभाग प्रमुख दिलीप कुवेसकर व वाहतुक सेनेचे सभासद हगर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!