परिवहनाच्या तर्राट चालकाने दोन किलेमिटर बस पिटाळली

वसई (वार्ताहर) : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसचालक सकाळीच तर्राट होवून मद्यधुंद अवस्थेत दोन किलोमिटर बस पिटाळून भिंतीला ठोकल्याचे उघडिकस आले आहे,सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही.

भगिरथी ट्रान्स कॉर्पोरेशन कंपनीद्वारे चालवण्यात येणारी महापालिकेची परिवहन सेवा आतापर्यंत अपघाती सेवा कुप्रसिध्द झाली आहे.बेलगाम,बेताल,उर्मट कर्मचाऱ्यांची भरणा असलेल्या या परिवहनाने आतापर्यंत अनेक प्रवाशांचे बळी घेतले आहेत.काल सकाळी तर परिवहनाच्या चालकाने तर्राट हावून प्रवाशांनी भरलेली बस दोन किलोमिटर पिटाळली.सकाळी 9.30 वाजता नालासोपारा-नाळा अशी ही बससेवा सुटली.प्रवाशी शिरल्यावर ती जत्रेतल्या खेळण्यांसारखी सुसाट आणि वेडीवाकडी धाऊ लागली.

त्यामुळे भयभित झालेल्या प्रवाशांनी आरडोओरडा करून बस हळु चालवण्याची विनंती चालकाला केली.मात्र,ही सुसाट धावणारी बस एका भिंतीला जावून धडकल्यावर चालकाचे बिंग फटले.हा चालक चक्क नशेत चुर होता.नशेतच त्याने बस सुसाट पळवली होती.बस भिंतीला धडकल्यामुळे मोठा अपघात टळला होता.त्यातील प्रवाशीही आणि रस्त्यावरील पादचारीही सुरक्षीत होते. परिवहनाच्या अशा वाहतुकीचा लोकांनी मोठया प्रमाणात धसका घेतला आहे.मारकी म्हैस पाहिल्यासारखे परिवहन सेवेच्या बसेस पाहिल्यावर इतर वाहन चालक आणि पादचारी भयभित होवून बाजुला होत आहेत.

दरम्यान,या अपघाताची माहिती प्रवाशांनी कळवल्यावर पोलीसांनी घटनास्थळी जावून मद्यधुंद चालक भागवत हरी हाके याला ताब्यात घेतले.त्याची वैद्यकिय तपासणी केल्यानंत परिवहन सभापती प्रितेश पाटील यांनी त्याला ताबडतोब बडतर्फ केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!