पर्यावरण पूरक पर्यटन प्रकल्पांचे पालघर जिल्ह्यात स्तागतच आहे – राजीव पाटील

नालासोपाऱा (रमाकांत वाघचौडे) : कोकण पर्व-कोकण सर्व या कोकण महामहोत्सवाची काल रात्री समारंभपूर्वक सांगता झाली.
महोत्सवाच्या मुख्य रंगमंचावर झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रथम महापौर राजीव पाटील यांनी पालघर जिल्हा आणि प्रामुख्याने वसई तालुका हे क्षेत्र जागतिक पर्यटन स्थळ म्हणून सर्वार्थाने योग्य आहे. जे जे या उद्योगाला आवश्यक असते ते सर्व इकडे उपलब्ध आहे. पर्यटन हा व्यवसाय पर्यावरणाला धोका निर्माण न करणारा आणि स्थानिकांना लाभदायक असतो. म्हणून या पुढे राज्य व केंद्र सरकारच्या वतीने जे प्रकल्प या संबंधी येतील त्यांचे स्वागतच केले जाईल. आणि पूर्ण सहकार्य केले जाईल असे विचार ब.वि.आ.पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रधम महापौर राजीव पाटील यांनी येथे व्यक्त केले.

राजीव पाटील

या बहुउद्दैशीय महोत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणारे माजी नगराध्यक्ष मुकेश सावे आणि यंगस्टार ट्रस्टचे अध्यक्ष लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र व्यस्त शेड्युअल मुळे आमदार यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. मुकेश सावे यांचा महोत्सवाचे प्रमुख कार्यकर्ते व राजीव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सावे यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या नगरसेवक व कार्यकर्त्यांचे कौतुक आपल्या भाषणात केले.
केवळ कोकण महोत्सवाची आखणी न करता त्या निमित्ताने कोकणाची खासियत नव्या पिढीला परिचित व्हावी. कोकणातील सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडावे. येथील महिला बचतगट अधिक उद्योगकर्ते व्हावेत. आणि या रंगमंचावर नवे प्रयोग यशस्वी व्हावेत, नव्या कलावंतांना संधी मिळावी असा व्यापक विचार आयोजनात होता असे ते म्हणाले. जो प्रतिसाद अपेक्षित होता तो या महोत्सवाला देणाऱ्या नालासोपाऱ्याच्या रसिकांनाही त्यांनी धन्यवाद दिले.
ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील यांनी कुडाळ व देवगडच्या खेळ्ये कलावंतांचे कौतुक करताना लवकरच आपणही असा महोत्सव आपल्या ग्रामीण भागात आयोजित करु आणि त्या भागातील कला रसिकांना हा आनंद मिळवून देवू असे प्रोत्साहन या कलाकारांना दिले. विशेषतः छोट्या गायक व वादक कलाकारांची त्यांनी स्तुती केली.
वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाचे कार्याध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनाही या वेळी गौरविण्यात आले. महोत्सवाचे पदाधिकारी देवेंद्र दांडेकर, वंदना वर्तक, ऍड.रमाकांत वाघचौडे, नरेश जाधव, मकरंद सावे, शांताराम वाळिंजकर, सीमा पाटील, नवनाथ पगारे, चेतन पाटील, नवीन वाघचौडे, अजय किणी ई.मान्यवर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. आयोजन मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले.
ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील यांनी कुडाळ व देवगडच्या खेळ्ये कलावंतांचे कौतुक करताना लवकरच आपणही असा महोत्सव आपल्या ग्रामीण भागात आयोजित करु आणि त्या भागातील कला रसिकांना हा आनंद मिळवून देवू असे प्रोत्साहन या कलाकारांना दिले. विशेषतः छोट्या गायक व वादक कलाकारांची त्यांनी स्तुती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: