पालघर जिल्हा वेट ऍंड पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पोलीस क्रीडापटुंचा वरचष्मा

विरार : पालघर जिल्हा व मुंबई ( सब.) वेट ऍंड पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विरारच्या अमेय क्लासिक क्लबच्या सहकार्याने आयोजित केलेल्या वेट आणि पॉवर लिफ्टिंग तसेच बेंच प्रेस लिफ्टिंग स्पर्धेत मुंबईच्या पोलीस लिफ्टर्स नी पॉवर लिफ्टिंग विभागात सर्वोत्तम गुणांची नोंद करत बेस्ट लिफ्टर्स ची पारितोषिके पटकावली व अव्वल स्थान राखले आहे.

मुंबई पोलीसात नोकरी करणारे मनोज मोरे ( शिव छत्रपती पुरस्कार विजेते) आणि अक्षता मिठबावकर यांनी अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत बाजी मारली आहे. यशवंत नगर येथील अमेय क्लासिक इंटरनैशनल क्लब येथे या स्पर्धांचा समारंभपूर्वक समारोप झाला. अमेय क्लबचे अध्यक्ष व प्रथम महापौर राजीव पाटील, जीवन गौरव पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक उदय देशपांडे, ज्येष्ठ क्रीडापटू व प्रशिक्षक शिवाय छत्रपती पुरस्कार प्राप्त मधुकर दरेकर, अपर्णा घाटे, मनोज मोरे आणि आयर्न मैन हार्दिक पाटील असे दिग्गज मान्यवर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडू व संघांना पारितोषिके व मानाचे बेल्ट प्रदान करण्यात आले.

 मधुकर दरेकर यांच्या हस्ते राजीव पाटील यांचा तर उदय देशपांडे यांचा राजीव पाटील यांच्या हस्ते या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. एकाच व्यासपीठावर तीन शिव छत्रपती पुरस्कार तर दोन जीवन गौरव आणि अत्यंत मानाचा असा आयर्न मैन पुरस्कार विजेते थोर क्रीडापटू व प्रशिक्षक यांचा गौरव करण्याची अमेय क्लबने संधी साधली.

  अंतिम निकाल.

बेस्ट पॉवर लिफ्टर (पु.) – मनोज मोरे. आणि बेस्ट पॉवर लिफ्टर महिला – अक्षता मिठबावकर., बेस्ट बेंच प्रेस लिफ्टर (पु.) – डारियल डिसुझा.

महिला विभाग – कल्पना सावंत बेंच प्रेस लिफ्टर्स संघ प्रथम-महिला. अमेय क्लासिक क्लब, विरार (पालघर)

पुरुष गट प्रथम –एंपायर जिम,गैरेगाव., पॉवर लिफ्टिंग विजेता संघ – स्मिताई फिटनेस भांडुप.,

महिला संघ.– चैतन्य जिम, गोरेगाव., बेस्ट युथ वेट लिर्फ्ट – वैभव भोईर, ठाणे., बेस्ट लिफ्टर (म.) –  संध्या कोकाटे,मुंबई.

ज्युनिअर मेन वेट लिफ्टर –  विजय फसाळे, ठाणे., वुमेन गट- शिवानी मोरे, ठाणे., विजेता संघ युथ (मुले.) उपविजेता संघ – ठाणे जिल्हा.,ज्यु.मुले.विजेता संघ -मुंबई उपनगर., मुलींमध्ये विजेता संघ -मुंबई उपनगर.

   ठळक घडामोडी.

* बेस्ट पॉवर लिफ्टर मनोज मोरे यांनी तब्बल 380 के.जी. एवढे वजन उचलून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. *  या स्पर्धेत वेट ,पॉवर,व बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग प्रकारात

मुंबई, उपनगर, ठाणे व पालघर अशा चार जिल्ह्यातील 90 महिला व120  पुरुष विविध गटातून सहभागी झाले होते. या संपूर्ण स्पर्धेत पी.एन.चोलकर, राजेश कामथे,पी.एन.नाईक, राजेश शर्मा,योगेश चव्हाण,सुनील दळवी,शिरीष रुमडे,मधुरा तोले,दत्ता तोले,सुनिल नरे,सिध्दार्थ चुरी,संजय मोरे संतोष घोटे या मान्यवरांनी पंच व गुणलेखक म्हणून जबाबदारी सांभाळली.

 अमेय क्लबचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांच्या टीमने आयोजनात परिश्रम घेतले. सर्व विजेते व सहभागी क्रीडापटुंचे ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक मधुकर दरेकर व राजीव पाटील यांनी कौतुक केले आणि आभारही मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!