पालघर जिल्ह्यातील कवींचे अमरावती येथे कविसंमेलन

पालघर (प्रतिनिधी) : रविवार दि. 3 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे पारपडलेल्या महाराष्ट्र कला, संस्कृती, साहित्य, संगीत व निसर्ग प्रेरणा महासंमेलन-2019 च्या कार्यक्रमात अ.भा. म. सा. प. पालघर जिल्हा अध्यक्ष डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. त्याचे सूत्रसंचालन डॉ. अलका नाईक व ऍड. नयन जैन यांनी केले. डॉ. के. डी. संखे, ऍड. विलास राऊत, ऍड. अर्चना जैन, प्रतिमा गायतोंडे, उज्ज्वला गायकवाड, मधुकर भोये, मनोज कामडी, अमोल गावड, सुभाष मोरे, प्रदिप पवार, भाऊसाहेब शेटे, सौ. छाया शेटे, कुमारी क्षितिजा शेटे, काकासाहेब भोरे आदि पालघर जिल्ह्यातील कवींनी आपली उपस्थिती नोंदवून स्वरचित कविता सादर केल्या.

डॉ. क्रांती महाजन मुख्य (आयोजक-अमरावती) आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे महासंमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्धाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे व आरती सचदेव (मुंबई) यांनी केले. पावर ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर आबिटकर, भारतीय सेनेचे कर्नल अभय पटवर्धन, लुईस अहमद पटेल, आंतरराष्ट्रीय जलतरण पटू (श्रीलंका) दर्शना लक्ष्मण, डॉ. निलय जैन इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते.

प्रविण पोटे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र गौरव-साहित्य पुरस्कार डॉ. अ. ना. रसनकुटे व डॉ. के. डी. संखे, डॉ. अलका नाईक, लायन राजेशकुमार बक्षी, ऍड. अर्चना जैन, प्रदिप पवार, भाऊ साहेब शेटे, यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ऍड. नयन जैन,प्रतिमा गायतोंडे, काकासाहेब भोरे, मधुकर भोये, छाया शेटे,  मधुबाला बक्षी,उज्ज्वला गायकवाड, मनोज कामडी, अमोल गावड, राजेश गवई, सुभाष मोरे, कुमारी क्षितिजा शेटे यांना समाजरत्न व साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  यावेळी भारतीय सेनेतील शहीद जवानांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी भारताच्या पंतप्रधानाना 11 लाख रूपयांचा धनादेश आरती सचदेव,मुंबई तर डॉ. अलका नाईक, मुंबई यांनी त्यांच्या सासूबाईंच्या नावे 1लाख रूपये पंतप्रधान सहायता निधीसाठी देण्याचा निर्धार केला. त्यानंतर भारतीय चित्रपटातील संगीत व गीतगायनाला उजाळा देणारी कालोपासना सादर करण्यात आली. त्यांचा उपस्थितानी मनमुराद आस्वाद घेतला. या महासंमेलनाला महाराष्ट्रातून बहुसंख्य लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!