पालघर जिल्ह्यातील हिंदू-मुस्लीम तेली समाज ब.वि.आ व मित्रपक्षांच्या पाठीशी

विरार :  लोकसभेच्या या निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील हिंदू-मुस्लीम समाज हा आम.हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील बहुजन विकास आघाडी पक्ष व मित्रपक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.
काल पालघर जिल्ह्यातील संत संताजी जगनाडे महाराज सेवा समितीच्या विभाग प्रमुखांनी विरारला जाऊन आम.हितेंद्र ठाकूर व युवा आमदार क्षितीज ठाकूर यांची भेट घेतली.
आमचा समाज नेहमीप्रमाणे बहुजन विकास आघाडी पक्षाबरोबर आहे. या निवडणुकीत आम्ही आमच्या समाजाचा पाठिंबा बिनशर्त आपणास म्हणजेच अनुभवी उमेदवार बळीराम जाधव यांना देत आहोत असे पत्र आम.हितेंद्र ठाकूर यांना दिले.
त्यांनी ते साभार स्विकारले.लगेच काम सुरू करा आणि सर्व समाज माध्यमांचा वापर करावा.आणि आपली नवी निशाणी सुद्धा जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचवावे असे आवाहन केले.
सर्वश्री प्रा.भगवान चौधरी,रिटायर्ड पोलीस निरीक्षक भगवान बोरसे, वकील रमाकांत वाघचौडे, अभियंता किशोर चौधरी, उद्योजक शंकर कोंडुरकर,युवा कार्यकर्ते योगेश चौधरी या विभागीय पदाधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!