पालघर जिल्ह्यात प्रथमच ऑॅनलाइन मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळा वर्ग

वसई : उत्तर कोकण मोडी लिपी मंडळ अंतर्गत पालघर जिल्ह्यात प्रथमच ‘ऑॅनलाइन मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळा वर्ग’ आयोजित करण्यात येत आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश शिवकालीन पेशवेकालीन ब्रिटिशकालीन इतिहास अभ्यासणे व मोडी लिपी इतिहास संकलित करण्यासाठी अभ्यासक, विद्यार्थी तयार करणे हा आहे. सदर ऑॅनलाइन वर्ग 1 नोव्हेंबर 2019 पासून सुरू होतील. मोडीलिपी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांना शिक्षणाची व वयाची अट नाही. परंतु उमेदवारास मराठी भाषा अवगत असणे जरुरीचे आहे. इतिहास अभ्यासक डॉ श्रीदत्त राऊत हे मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करतील. प्रत्येक प्रशिक्षण वर्ग एक महिना कालावधी मर्यादेचा असून या उपक्रमात प्रवेश घेण्यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. यासाठी उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाच्या 9324222189 व्हाटसएप क्रमांक वर मेसेज करून माहिती मिळवणे. सदर उपक्रमाबद्दल तपशील संवाद साधण्यासाठी 9764316678 वर फोन करावा.

विद्यार्थी मित्रांना मोडी लिपी अभ्यासासाठी ही विशेष पर्वणीच आहे. सर्व सहभागी विद्यार्थी मित्रांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाचे प्रतिनिधी सदर उपक्रमात ङ्गमोडी लिपी इतिहास संकलनङ्घ यावर मार्गदर्शन करतील. सदर उपक्रमात महाराष्ट्र प्रांतातील विभागावर विद्यार्थी सहभागी होणार असून यात प्रशिक्षण वर्ग, चर्चा सत्र, संशोधनपर लेख, ऑॅनलाइन परीक्षा, इतिहास मार्गदर्शन, परिसंवाद कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग संमेलन इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मोडी लिपी प्राथमिक अभ्यासक्रम अंतर्गत मोडी अक्षरे, स्वर, व्यंजने, जोडाक्षरे, पत्राचे मायने, पत्रवाचन, निबंध लेखन इत्यादी अत्यंत महत्वाचे ज्ञान प्रत्येक वयोगटातील जिज्ञासू व्यक्तींना घर बसल्या तसेच स्वत:च्या नोकरीची धावपळ सांभाळून करता येणे शक्य होणार आहे. विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीच्या संवर्धनासाठी व जतनीकरणासाठी करण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्वांचाच सहभाग मोलाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!