पालघर पोलीसांचे आवाहन ; एटीएममधून पैसे काढताना सावधान

वसई (वार्ताहर) : एटीएम सेंटरच्या बाहेर उभे राहून हॅकर्स ग्राहकांची फसवणूक करीत असल्यामुळे एटीएममधून पैसे काढताना सावध राहण्याचे आवाहन पालघर पोलीसांनी केले आहे.

एटीएममधून पैसे काढत असताना काही चोरटे तुम्हाला हेरत असतात,पैसे येण्यास उशीर झाल्यावर हे चोरटे तुम्हाला बोलण्यात गुंतवून कार्डचचा पीन नंबर बघून घेतात.त्यानंतर तुमचे कार्ड गायब करून निघून जातात.काही वेळानंतर तुमच्या खात्यातून हजारो रुपये काढून घेतल्याचा मेसेज येतो.त्यामुळे तुमची फसगत झाल्याचे उशिरा कळते.परिणामी एटीएममधून पैसे काढताना संशयीत इसम जवळपास आढळल्यास नियंत्रण कक्ष-8669604100, 97307110 किंवा 97308119 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालघर पोलीसांनी केले आहे.तसेच दोन हॅकर्सची छायाछित्र प्रसारीत करून त्यांची माहिती देण्याचे आवाहनही पोलीसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!