पालघर रेल्वे स्थानकाबाहेरील राष्ट्रध्वज एका वर्षात गायब…

पालघर (वार्ताहर) : भारतीय रेल्वेतर्फे देशातील प्रमुख आणि महत्त्वांच्या रेल्वे स्थानकांवर ३०x२० फुटांचे आणि १०० उंचीवर राष्ट्रध्वज लावण्यात आले. पालघर जिल्हयाचे प्रमुख रेल्वे स्थानक तसेच जिल्हा मुख्यालयाचे स्थानक म्हणजे पालघर रेल्वे स्थानक. या स्थानकात साधारणता वर्षभरापूर्वी तिरंगा फडकविण्यात आला होता. पण विविध तांत्रिक अडचणी आणि कारणे सांगून आॅगस्ट महिन्यांपासून सदर राष्ट्रध्वज काढून टाकला होता.
प्रवाशांनी आणि प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मुद्दा उचलून धरला पण निर्ढावलेले रेल्वे प्रशासन थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ खाऊ पणा सुरू केला. आज लावतो….४ दिवसांनी लावतो अशा पोकळ आश्वासना पलिकडे काहीच माहिती मिळत नव्हती. शेवटी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था व इतर प्रवाशी संघटनांनी पालघर आमदार श्रीनिवास वनगा यांची भेट घेऊन प्रकार सांगितला. आमदार वनगा रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता २५ तारखे पर्यत तिरंगा लावण्यात येईल असे सांगितले.


२६ तारखेला भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आमदार यांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता तिरंगा लावण्यात आला नसल्याचे दिसून आले.
यानंतर आमदार, पालघर स्टेशन सल्लागार समिती, प्रवाशी संघटनांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला.एकाही रेल्वे अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर दिले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधे फोन उचलण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही. झाला प्रकार पाहता आमदार साहेबांनी तीव्र असंतोषाची भावना व्यक्त केली. लोकप्रतिनिधींना दिशाभूल करणारी माहिती दिली जाते तर सामान्य माणसांचे काय ? संविधान दिनाच्या दिवशी सुद्धा राष्ट्रध्वज लावला जात नसेल तर काय म्हणावे. रेल्वे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालणार नाही. सोमवार ३० नोव्हेंबर दुपारी १२.०० वाजेपर्यंत तिरंगा फडकला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहिल.
या प्रकरणानंतर हालचालींना वेग आला आणि अखेर ३० तारखेला पालघर रेल्वे स्थानकात आमदार श्रीनिवास वनगा साहेबांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला.
यावेळी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, पालघर स्टेशन कमिटी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शहा, शिवसेना पालघर जिल्हा व पालघर शहर पदाधिकारी, पालघर स्थानक मास्तर संजय पाटील व राजेश पाटील, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, गव्हरमेंट रेल्वे पोलिस, आय.ओ.डब्ल्यू कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी स्टेशन परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. पालघर रेल्वे स्थानकात तिरंगा पुन्हा डौलाने फडकला याचे सर्व श्रेय प्रवासी संघटना, प्रवासी आणि कार्यकर्त्यांचे आहे.
रेल्वेचे सुद्धा विशेष आभार : ज्या प्रमाणे तिरंगा पुर्ववत करण्यात आला त्यापद्धतीने रेल्वेने डहाणू ते वैतरणा दरम्यानचे कमी केलेले थांबे पुर्ववत करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!