पालघर लोकसभा मतदारसंघात 18 लाख 12 हजार 983 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पालघर : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार 22-पालघर (अज) मतदार संघासाठी 29 एप्रिल रोजी निवडणूक होणार असून यासाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित 18,12,983 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 9,49,592 पुरूष, 8,63,301 महिला तर 90 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याने यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघामधील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे : डहाणू मतदारसंघ- पुरूष- 1,34,104, महिला- 1,31,776, तृतीयपंथी- 6, एकूण- 2,65,886. विक्रमगड- पुरूष- 1,31,416, महिला- 1,27,916, एकूण- 2,59,332. पालघर- पुरूष-1,35,224, महिला- 1,30,537, तृतीयपंथी- 13, एकूण- 2,65,774. बोईसर- पुरूष- 1,48,079, महिला- 1,27,595, तृतीयपंथी- 24, एकूण- 2,75,698. नालासोपारा- पुरूष- 2,54,717, महिला- 2,08,065, तृतीयपंथी- 44, एकूण- 4,62,826 आणि वसई- पुरूष- 1,46,052, महिला- 1,37,412, तृतीयपंथी- 3, एकूण- 2,83,467.

पालघर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या अंदाजित लोकसंख्येच्या तुलनेत पुरूष मतदारांचे प्रमाण 71.76, महिलांचे प्रमाण 73.94 तर एकूण 72.79 टक्के असे आहे. डहाणूमध्ये पुरूष- 68.45, महिला 75.57, एकूण- 71.80 टक्के. विक्रमगड- पुरूष- 61.26, महिला- 74.14, एकूण- 67 टक्के. पालघर- पुरूष- 69.90, महिला- 74.51, एकूण- 72.10 टक्के. बोईसर- पुरूष- 75.16, महिला- 72.29, एकूण- 73.81 टक्के. नालासोपारा- पुरूष- 79.82, महिला- 73.31, एकूण- 76.76 टक्के आणि वसई- पुरूष- 71.88, महिला- 74.20, एकूण- 72.99 टक्के असे हे प्रमाण असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

One comment to “पालघर लोकसभा मतदारसंघात 18 लाख 12 हजार 983 मतदार बजावणार मतदानाचा हक्क”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!