पालेभाज्या-फळ-फूल शेती किडनाशकांचा वापराबाबत तज्ञांचे उपयुक्त मार्गदर्शन

नालासोपारा (रमाकांत वाघचौडे) : कोकण पर्व-कोकण सर्व महोत्सवातील प्रशिक्षिण विभागात  दि.३० रोजी शेतकऱ्यांना शेतीविषयक तज्ञ अधिकाऱ्यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले.

बहुजन विकास भवन सभागृहात ही व्याख्याने झाली. शेतकरी व शेतीतज्ञ सुभाष भट्टे यांचा विषय होता ‘फूल शेती आणि व्यवसाय’ तुळस, जास्वंद, तगर, लिली, झेंडू आणि दुर्वा यांचा वापर आपल्याकडे पूजा अर्चेत सर्वाधिक केला जातो. सोनचाफा, मोगरा, सायली लागवड आणि संवर्धन या विषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. चाफा, मोगरा आणि तुळस ही लागवड व्यावसायिक हेतूने केली तर अनेक महिलांना ते उत्पन्नाचे साधन म्हणून उपलब्ध होऊ शकते. तुळस लागवड सहज व कमी पाणी, कमी जागा आणि शून्य वीज वापरामुळे ती किफायतशीर असते. घरगुती तुळशीला सारखे पाणी घालू नये. मात्र घरोघरी तुळस असावी असेही भट्टे म्हणाले.

दुसरे व्याख्यान पालघर क्रुषी संशोधन केंद्राचे डॉ.एल्.के.गभाले यांचे होते. कोबी, मिरची, टोमॅटो, वांगी, फुलकोबी, नवलकोल, ब्रोकोली,काकडी, कारली अशा भाज्या कमी जागेत आणि कमी वेळेत मिळतात. या भाज्यांचे उत्पादन वाढवणे या साठी शेतकऱ्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. मातीचे परिक्षण करुन घेणे गरजेचे असते. आणि हाताशी आलेल्या भाज्यांची प्रतवारी उत्तम रहावी यासाठी किटकनाशके व फवारणी योग्य वा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी अशी सूचनाही त्यांनी केली. आज प्रशिक्षण भागात अशोक भोईर, प्रसाद सावे, प्रा.उत्तम सहाने या शेतकरी उद्योजकांनी आपले अनुभव आणि शेती व्यवसायात केलेल्या प्रगतीचे मूळ कथन केले. शेती हा व्यवसाय सर्व व्यवसायात उत्तम आहे मात्र आता तो इतरांचे अनुकरण न करता तज्ञ व्यक्ती आणि शासकीय क्रुषी विकास व संशोधन केंद्राच्या मार्गदर्शना प्रमाणे केले तर अधिक फायद्याचे ठरते असे प्रसाद सावे यांनी नमूद केले. या व्याख्यात्यांनी उपस्थित शेतकरी, विद्यार्थी व उद्योजक यांच्याशी चर्चा सुध्दा केली.

प्रशिक्षण विभाग प्रमुख वंदना वर्तक, सहाय्यक सीमा पाटील, महोत्सवाचे पदाधिकारी नरेश जाधव व रमाकांत वाघचौडे यांनी या व्याख्यात्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: