पुढची निवडणूक आम्हीच मारणार – आम. हितेंद्र ठाकूर

अनिकेत जोशी

विरार पश्चिमेला पूल उतरला की जवळच विवा कॉलेज आहे. तिथे कॉलेजच्या मागच्या बाजूला आमदार व बहुजन विकास आघाडीचे संथापक अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे कार्यालय आहे. ठाकूर साहेब कुठे बसतात कुणाला विचारण्याचीही गरज लागली नाही. कारण तिथे गर्दीची जत्राच जमलेली होती. पण ही गर्दी बेशिस्त नव्हती. लोक शांतपणे उभे होते. जागा मिळेल तिथे बसले होते. आमदार ठाकूर उर्फ जनतेचे लाडके अप्पा अद्याप तिथे आले नव्हते. माझे मित्र निरंजन राऊत हे विरारकरच. त्यांना या कार्यालयातील सारेच ओळखत होते. त्यामुळे आम्हाला लगेच आप्पा जिथे बसतात त्या दालनात नेण्यात आले. तिथे आधीच एक दोन मंडळी बसली होती. आमदार हितेंद्र यांचे निकटवर्ती नगरसेवक,पक्षाचे पदाधिकारी आदि, तिथे बसता क्षणीच चहा कप समोर आला. ही इथली पध्दत होती. जो कोणी इथे येईल त्याला लगेच चहा पाणी विचारणा झालीच पाहिजे. पाणी विचारण्याची गरज नव्हती. कारण समोर पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. थोडयाच वेळात ठाकूर यांची गाडी आली. ते दृश्य समोरच्या खिडकीतून दिसतच होते. गाडीतून उतरताच ते समोर दिसणाऱ्या एकेकाची चौकशी करत करत त्याची कामे मार्गी लावत होते. ते कार्यालयाचे दालनात आले व त्यांच्या खुर्चीत बसले. लोकांचा ओध सुरूच होता. कुणाला तहसीलमधून दाखला हवा होता. कुणाच्या वॉर्डात पाण्याचा प्रश्न होता. कुणाला शाळा कॉलेजात प्रवेशाची अडचण होती,कोणाच्या सोसायटीचे वाद सुरु होते, चार पाच लोकांचा एक गट बिल्डरने फसवल्याची तक्रार घेऊन आला होता. त्या बिल्डरच्या विरोधात फौजदारी प्रकरण सुरूही झाले होते. पण त्या मंडळींनी सरकारी वकील चांगला मिळावा असे वाटत होते. आमदार साहेबांनी लगेचच पीएल सांगितले की मुख्यमंत्र्याना विनंती पत्र लिहा की या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केली जावी. तिने मंडळी खूष होउन बाहेर गेली. एक-दोन मिनिटातच साऱ्या मंडळींची कामे मार्गी लागत होती.

भराभर गर्दी कमी होत गेली. मग ठाकुरांनी मोर्चा आमच्याकडे वळवला. गप्पा सुरु झाल्या. ते सांगत होते की कुणालाच अधिक काही बोलण्याची गरज पडत नाही. मला लक्षात येते की यांचे काय काम आहे, नेमके दुखणे काय आहे. त्यावर मी लगेच योग्य तो उपायही करून टाकतो. लोक समाधानी होउन बाजूला होतात. त्यांचे प्रश्न मार्गी लागलेले असतात. इतक्यात एक महिला आल्या. त्यांनी एमबीए केले होते. पण लहान मूल असल्यामुळे, विरारमध्येच चांगली नौकरी मिळते का ते त्यांना हवे होते. आमदार ठाकुरांनी स्पष्ट केले की,हे बघा ताई तुम्हाला मी मदत इतकीच करू शकतो के तुम्हाला माहिती असेल की अमुक ठिकणी व्हेकन्सी आहे, तर मी तिथे फोने करून शकतो. पण तुम्ही म्हणाल की तुमच्यासाठी मी नोकरी शोधावी, तर तसे होणार नाही. ते मी करू शकत नाही. तरीही त्या बाई सांगत राहिल्या की त्यांना मुंबईत चांगल्या पगाराच्या ऑॅफर येतात, इथेही जॉब असतात पण पगार तितके देत नाही ! ठाकूर म्हणाले की हे सांगा पत्रकार महोदय, आता यावर आमदार काय करणार ?! एका मर्यादेपर्यंतच मदत करता येते. नौकरीही द्या आणि पगारही अधिक द्या अशी शिफारस कुणाला कशी बरे करता येईल.

पण त्या कार्यालयात काही वेळ बसल्यानंतर एक नक्कीच जनावले की आमदारांकडे शेकडो प्रकारचे लोक त्यांचे हजारो प्रश्न घेउन येतात. हे सारे ऐकून ऐकून तुम्हाला त्रास नाही होत ?हितेंद्र ठाकूर म्हणाले की, काय करणार ? लोकांना आशा असते. पण मी त्याचे सारे ऐकू लागलो तर वेदा होईन. दोन वाक्यात माझ्या लक्षात येते की नेमकले काय हवंय ? त्यात मला काय करता येईल, हेही मी स्पष्ट सांगून लोकांची पाठवणी करतो. लोक समाधानी होतात. त्यांना खोटी आशा लावणेही चूक असते हेही ते आवर्जून सांगतात.

या गप्पांमध्ये दसरा मेळाव्याचा उल्लेख येणे अपरिहार्यच होते. शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिर्डीत झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण, दोन्ही समोरच होते. आम. ठाकूर यांच्या मते या दोन्ही पक्षांची युती ऐन निवडणुकीत वेळी झालेली दिसणार आहे. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींनी मानले पाहिजे ते त्यांच्या मीडियाच्या हाताळणीसाठी त्यांच्या कार्यक्रमाचे सारे कव्हरेज फक्त दूरदर्शनचाच कॅमेरामॅन करत असतो अणे अन्य चॅनेलना हवे असल्यास दूरदर्शन कडूनच फीड घ्यावे लागते. त्यामुळे मोदींना गौरसोयीचे ठरेल असे कोणतेच चित्र वा चलतचित्र कोणत्याच चॅनेलवरून दिसत नाही. एखाद्या सभेत कोणी उठून जातो, कुठे खर्ुच्या रिकाम्या आहेत, कुठे काही प्रसंग घडतो आहे… अशी दृष्ये मोदींच्या सभांमध्येही घडतच असतात पण ते लोकांच्या पुढे येतच नाही, कारण यांची हुषारी…!

मागच्या चार महिन्यात पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा विषय निघतो, तेव्हा आम. हितेंद्र ठाकूर भरभरून सांगू लागतात. आमच्या वसई तालुक्यात भाजपाने पूर्ण जोर लावलेला होता. जिथे उत्तर प्रदेशाचा मतदार आहे तिथे युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ फिरत होता, कुठे बिहारी मंडळींची पॅकेट आहे तिथे तिकडचे मंत्री, आमदार आले होते. स्वत: मुख्यमंत्री पाच पाच वेळा येउन गेले. ते मंत्री गिरीश महाजन तर इथंच तळ ठोकून होते. या अशा थैल्या मोकळया सुटलेल्या होत्या. ज्याला पाहिजे त्याला पैसा, साधन-सामग्री मुक्त हस्ते वाटली जात होती. तरी पण काय झाले ? वसई तालुक्यात आमच्या उमेदवाराला एकूण मतदान पैकी 54 टक्के मतदान झाले ! शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांपेक्षा ही मते किती तरी अधिक होती.

पण मुळात बहुजन विकास आघाडीचा उमेदवार, तुम्ही या पोटनिवडणुकीत देणारच नव्हता ना, मग का दिलात ? या प्रश्नावर मात्र आम. ठाकूर उसळतात. ते म्हणाले की मी तर आधीच सांगितले होते की वनगासाहेब हे आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या घरातील कुणालाही तिकीट द्या, आम्ही तुम्हाला सहकार्यच करू. मी ही जाहीर सभेत बोललो होतो. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या टप्प्यावर वसईतील एका जुन्या पतपेढीच्या कार्यक्रमासाठी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख आले होते. तेथे मी भाषणात सांगितले की निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्हीही तुमच्या सोबत आहोत. मात्र निवडणूक होणारच असेल तर मग आमचाही उमेदवार असणारच हेही मी बजावले होते. आता बिनविरोधज करण्याची जबाबदारी मुख्यमंत्रयांनी घ्यायला हवी होती. मी सुभाषबापुंना हेही सांगितले होते. राजकीय अंदाजात अप्पा ठाकूर हे पक्के आहेत हे सारेच जाणतात. त्यांनी स्पष्टच मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की वनगांच्या मुलाला व पत्नीला उमेदवारी द्या, काँग्रेसशी बोला. काँग्रेसला सांगालीत तुमचे (कै पंतगरावांच्या मतदार संघातील पॉट निवडणुकीत) समर्थन हवे असेलच. तिकडे विदर्भातही पोटनिवडणूक आहे. कुणाला काय द्यायचे, कोणी कुठे लढवायचें ते तुम्ही ठरवा व मला सांगा. पालघरमध्ये कम्युनिस्टांचा उमेदवार असणारच काही झाले तरी, पण काँग्रेस व तुम्ही ठरवत असाल तर आम्हीही त्यात असू. बिनविरोध करू, हितेंद्र ठाकूर म्हणाले की पण शिवसेनेचे काय चालले आहे, हे लक्षात आले नाही, असे दिसते… शिवाय वनगांच मुलगा भाजपा सोडतो ही संगाच्या लोकांना जिव्हरी लागणारी बाब होती. वनगा हे संघाचे मूळचे. नंतर ते भाजपात आले. कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात तलासरीमध्ये, जिथे काम करायचे म्हणजे जीवाचा धोका होता, रोज कम्युनिस्टांशी लढाईच होती, त्या ठिकाणी पाय रोवून ठाम उभे राहायचे ही साधी गोष्ट नव्हती. अशा चिंतामण वनगांच्या मुलाला, पत्नीला वाटावे की आम्हला पक्षाने वाऱ्यावर सोडले हेही योगच नव्हते. पण ते भाजपाला ती निवडणूक बिनविरोध नाही करता आली याची खंतही आम होतेंद्र ठाकूर व्यक्त करतात. मुलगा शिवसेनेत गेला. पण यांनी सारी प्रतिष्ठा पणाला लावली व त्याचा पराभाव करण्याच ठरवले… हा सारा विचित्र राजकीय प्रसंग घडला. पण आम्हाला बहुजन विकास आघाडीला समाधान हे की आमचा मतदार इतक्या प्रलोभनामध्ये, इतक्या दबावातही अजिबात हलला नाही.

पुढच्या निवडणुकीत काय होईल ? याचे उत्तर ठाकूर यांच्याकडे तयारच आहे. सर्वसाधारण निवडणुकीत एकटया पालघरमध्ये भाजप व सेने किती ताकद लावेल ? तेव्हा इथे तर आम्हीच आहोत…! असा विश्वास ते व्यक्त करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!