पूरपरिस्थितीवर आपण मार्ग काढण्यासाठी आम्ही वचनबद्ध – राजीव पाटील 

नालासोपारा (प्रतिनिध) : दरवर्षी अधिक प्रमाणात पाऊस पडला की आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात जलकोंडी होते. सर्वांचेच मोठे नुकसान होते.
यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आपले नेते आम.हितेंद्र ठाकूर गाभीर्याने लक्ष घातले आहे. आणि त्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेला आपल्या पालिकेने एक मोठा नाला बांधकाम सुरू केले आहे. दोन कि.मी. लांब,आठ मीटर रुंद आणि अडीच मीटर खोल असा महाकाय हा नाला येत्या पावसाळ्याआधी तयार करण्यात येणार आहे.
शिवाय पश्चिमेला असणाऱ्या नाल्याचे सुद्धा रुंदीकरण आणि खोलीकरण होणार आहे. काही मोकळ्या भूखंडांचा वापर पावसाळी पाण्याचा निचरा करण्यात केला जाणार आहे. या कामांमुळे आता पावसाळ्यात मोठी जलकोंडी होणार नाही असा विश्वास मला वाटतो. तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा.आपला बहुजन विकास आघाडी पक्ष, आपले आमदार क्षितीज ठाकूर वचनबद्ध आहेत. अशा शब्दांत ब.वि.आ. पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रथम महापौर राजीव पाटील यांनी सोपाऱ्यातील कार्यकर्ते व नागरिकांना विश्वास दिला. नगरसेविका निलिमा कांबळे यांच्या वॉर्डात येऊन त्यांनी हा संवाद साधला.
आपण ही निवडणूक जिंकणारच आहोत. कारण आपण नागरिकांना जे जे हवे असते ते ते देण्यात कुठे कसर ठेवला नाही. सर्व  क्षेत्रात आणि आघाडीवर आपण चांगले काम केले आहे. या ऊलट विरोधकांनी फक्त विरोध करण्याचे आणि पोकळ आश्वासनं देण्याचे काम केले आहे. आमदार हा आपल्या शहरातील, स्थानिक आणि नागरी प्रश्नांची जाण असणारा, अभ्यास असणारा, विकासाचे व्हिजन असणारा असावा. आणि ही सारी गुणवत्ता आपले उमेदवार क्षितीज ठाकूर यांच्या अंगी आहे, असेही पुढे बोलताना राजीव पाटील म्हणाले.
नगरसेविका निलीमा कांबळे व त्यांच्या वार्डातील महिला कार्यकर्त्या, कार्यकर्ते आणि साईनगर मधील नागरिक या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!