पूर्वीप्रमाणे निर्मळ क्षेत्री पुन्हा पदयात्रा व दिंडींचे आगमन !

श्रीक्षेत्र निर्मळची स्थापना भगवान श्रीपरशुरामांनी त्रेतायुगात केली. स्त्रिलंपट विमलासुराचा वध करून भगवान परशुरामांनी येथे विमल सरोवर, निर्मळ सरोवर, श्रीविमलेश्वर महादेवाची स्थापना करून ऋषीमुनींच्या तपस्येसाठी सुंदर वन-उपवने निर्माण केली. या तीर्थ क्षेत्रातील पवित्र वातावरणात स्नान करून, तर्पण, दान-धर्म, भजन, कीर्तन करून पापे धूण्यासाठी व पुण्य प्राप्तीसाठी वाजत गाजत दिंड्या काढून भक्तजन  येतात. 
पूर्वी अनेक दिंड्या येथे येत असत, परंतु काही वर्षांपासून सरोवरतीर्थाची अस्वच्छता, चालू झालेले जुगार, डिस्को, डीजे फिल्मीगाणी, मांसाहार विक्री वगैरे धार्मिकभावना दुखावणाऱ्या गोष्टींमुळे भाविक भक्तांची येण्याची संख्या कमी झाली होती. जुगार, डिस्को, मांसाहारचे शिजवणे व दुर्गंधयुक्त धूर बंद झाले आहेत, डीजे फिल्मीगाणी यांवर पूर्णपणे नियंत्रण आले आहे. यंदा एका ऐवजी चार  दिंडी यात्रेत भजनांच्या व वाद्यांच्या तालासुरात दाखल झाल्या. एक दिंडी न्यू इंग्लीश स्कूल व निर्मळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आली. दुसरी दिंडी नवाळे, कोरोटी व वाघोली गावातून दाखल झाली. तिसरी दिंडी गिरीज, वासळई, वसई गावातील सर्व जातीय भक्तांची दाखल झाली व चौथी दिंडी गास गावातून आली. दिंडींत सहभागी होणार्यांची भक्ती पाहून यात्रेकरूही भारावून गेले.
यंदा निर्मळ यात्रेत शिंगाडे, सुकेळी, रामकंद, पापड, गुलाबजामून, खजूर, मेवा, फरसाण, चिवडा यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे दुकानदार म्हणत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गही फार खूष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!