पूर्व पट्टीतील नागरिकांसाठी जात दाखल्यांचे वाटप

आम.राजेश पाटील यांचा पुढाकार,मान्यवरांची उपस्थिती

विरार (प्रतिनीधी) : बोईसर मतदार संघाचे आमदार राजेश रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व पट्टीतील नागरिकांसाठी महत्त्वाचे असे जातीचे दाखले ग्रामीण भागात जाऊन देण्याचा व्यापक कार्यक्रम सुरु झाला आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज पूर्व पट्टीतील शिवणसई या गावात जातीचे दाखले वितरित करण्यात आले. आम.राजेश पाटील, प्रांत अधिकारी (वसई) स्वप्निल तांगडे, या विभागाचे मंडळ अधिकारी, बहुजन विकास आघाडीचे विविध गावांचे सरपंच, उप-सरपंच, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आणि अनेक लाभार्थी नागरिक या स्तुत्य उपक्रमात सहभागी झाले होते.

या प्रसंगी बोलताना आम.राजेश पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना जातीचे दाखले मिळविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. काही नागरिकांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात आपले ज्येष्ठ नेते, पक्षाचे अध्यक्ष लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर, आम.क्षितीज ठाकूर व माझ्याकडे अशा कार्यक्रमांची गरज असल्याची आग्रही मागणी केली होती. त्याप्रमाणे आपण आता वसई तालुक्यातील पूर्व पट्टीतील नागरिकांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. शेकडो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या पुढील कार्यक्रमांचाही या भागातील लोकांनी फायदा करून घ्यावा.
कोरोना विरुद्धच्या लढाईत नागरिकांनी शासनाला साथ द्यावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे आणि आयोजनात मदत करणाऱ्यांचे प्रांत अधिकारीस्वप्निल तांगडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!