पोलीस अधीक्षक गौरवसिंग यांच्या बदलीच्या हालचाली ?

वसई (प्रतिनिधी) : हल्ली कडक शिस्तीचा, प्रामाणिक पोलीस अधिकारी, अनधिकृत कामे करणाऱ्या समाजकंटकाना रुचत नाहीत.नवीन अधिकारी रुजू झाला की त्याचे स्वागत करण्यासाठी रांगा लागतात,पण तोच अधिकारी कडक शिस्तीने वागू लागला कि हेच हितचिंतक त्याच्या बदलीच्या मागे लागतात. दुर्देवाने त्यांच्या अशा प्रयत्नाला राजकीय नेत्यांचेही पाठबळ मिळत असते.
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी आपल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत रेती, दारू व काळा गुळाची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या तसेच गुंडगिरी करणाऱ्या समाजकंटकाच्या चांगल्याच मुसक्या बांधल्या.त्यामुळे त्यांची पळता भुई थोडी झाली. त्यामुळे ही सर्व मंडळी,आता पोलीस अधीक्षक गौरवसिंग यांची बदली व्हावी यासाठी कामाला लागले आहेत. त्यांनी नुकतीच एका ज्येष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन त्याला साकडे घातले आहे.या नेत्याने यापूर्वीही एका सनदी अधिकाऱ्यांची बदली केली होती, परंतु त्या बदलीमुळे दुखावलेल्या भाजपच्या तत्कालीन ज्येष्ठ मंत्र्यांने हस्तक्षेप करून माजी मुख्यमंत्री फडणवीसांना रद्द करायला लावली. या सर्व घडामोडीमुळे पालघरवासीयांमध्ये संतापाचे वातावरण असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करून गौरवसिंग यांची बदली होऊ देता कामा नये, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!