पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी ४ सुर्वण पदके मिळवून श्रीलंकेत फडकविला तिरंगा

पालघर (वार्ताहर) : दिनांक १२/०५/२०१९ रोजी श्रीलंका या देशात पार पडलेल्या १७ वी टेनशिप कप इंटरनॅशनल कराटे चॅम्पिअनशिप २०१९ या स्पर्धेमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करत १). फस्त मेन ओपन काटा, २). फस्त में ओपन कुमितो, ३). फस्त में ओपन टीम काटा, ४). फस्त में ओपन टीम कुमितो या चार प्रकारच्या स्पर्धेमधून ४ सुवर्ण पदके जिंकून श्रीलंका या देशामध्ये भारताचा तिरंगा ध्वज फडकविला आहे.

रितेश दिनेश प्रजापती हे पोलीस कर्तव्यात कोणीही कसर न करत निवडणूक कार्यकाळामध्ये निवडणूक बंदोबस्तसारख्या महत्वाच्या पोलीस दलातील दैनंदिन कर्तव्य पार पडूनही दिवसातून ५ ते ६ तास ट्रैनिंग करून कराटे सर्व करून हे यश संपादन केले आहे. त्यांना पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले व त्यांचे अभिनंदन ही केले. तसेच पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!