प्रजेच्या सत्तेसाठी वसईत लाक्षणिक उपोषण 

वसई (वार्ताहर) : प्रजासत्ताक दिन जवळ आलेल्या असतानाही वसईकरप्रजा मात्र,खऱ्या खुऱ्या सत्तेपासून दुर राहिल्याचा आरोप करीत मी वसईकर अभियानाने सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

अभियानाचे अध्यक्ष मिलींद खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शाम पाटकर, विजय पाटील,निलेश पेंढारी,ऍड.जीमी घोन्सालविस,नोवेल वाझ,किरण शिंदे,विनायक निकम,राजेश गवाणकर यांच्यासह भाजपा, काँग्रेस, शिवसेना, जनता दल अशा विविध पक्षातील पदाधिकारी सहभागी झाले होते.आम्ही अगोदर वसईकर आहोत नंतर पक्षाशी बांधील आहोत,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वसई-विरार महापालिकेतून ३५ गावे वगळण्याच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली, त्यांनी वसईकर जनतेला गाजर दाखवले आहे.असा आरोप करीत वाढीव घरपट्टी आणि शास्ती रद्द करावी, पावसाळयात बुडालेली वसई,ग्रामिण जनतेता प्यायचे शुध्द पाणी,रेल्वेचा जीवघेणा प्रवास,वाहतुक कोंडीची, बुलेट ट्रेन, कॉरीडोरसाठी शेतजमीनींचे ग्रहण,पर्यावरणाचा ऱ्हास अशा विविध प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!