प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेणाऱ्या चंद्रा कुंदाकृष्णा जाधवचे १२वीत उल्लेखनीय यश !!

वसई (प्रतिनिधी) : भिवंडीत तालुक्यातील गाणे फिरिंगपाडा दुर्गम आदिवासी खेडयात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या आदिवासी कातकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रा ने नुकतेच बारावीच्या परीक्षेत ७९.८४ % गुण मिळवून उज्वल यशसंपादन केले आहे. इतिहासात गुरुवर्य द्रोणाचार्यानी शूद्राचा मुलगा म्हणून एकलव्याला शिक्षण नाकारले. आज आपल्या देशातील सामाजिक आर्थिकव्यवस्थेत शिकण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिक्षणा पासून वंचित राहणारीलाखो मुले मुली आहेत. चंद्राही त्यांपैकीच एक होती. मात्रचंद्राला तिच्याच गावातील एक कार्यकर्ती श्रमजीवी संघटनेतठाणे जिल्ह्याच्या शेतकरी प्रमुख असलेल्यासंगिता भोमटे यांनीवि संसद संचालित एकलव्य परिवर्तन शाळेपर्यंत आणण्याचे काम केल्याने, चंद्रालाशिक्षणाचे दार उघडले गेले.बारावीची परीक्षा चालु असताना तिच्याकडे एकेकदा परीक्षा केंद्रावरजायलाही पैसे नसायचे. इतिहासाच्या पेपरला तर रस्त्यात ट्रॅफिक असल्याने अर्धा तास उशिराने परीक्षा केंद्रावरपो तरी तिने जिद्दीने पेपर लिहिला आणि इतिहासात ८८ मार्क मिळविले.

एकलव्य परिवर्तन शाळेत दाखल झाल्यानंतर इथे तिला विवेकभाऊ व विधुल्लता ताईं यांची सततची प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले. त्यांनी समाजातील शोषित-वंचित-श्रमजीवींसाठी सुरु केलेल्या माणुसकीचे न्याय्य हक्क व सन्मानासाठीच्या चळवळीची चंद्रा बालवयातच एक भाग बनली.वीट-भट्टी वरील वंचित बालकांच्या शिक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एका शिवजयंती दिनी चंद्राच्या नेतृत्वाखालील वीट-भट्टी वरील बालकांच्या शिष्टमंडळाने पालघर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊ न त्यांना निवेदन सादर केले. यावेळी बाणेदारपणे चंद्राने वीट-भट्टी वरील बालकांच्या शिक्षणाची परिस्थिती जिल्हा परिषद सि.ई.ओ यांना विशद केली.चंद्रा शाळेची एक आदर्श विद्यार्थीनी म्हणून नावाजली गेली. ९ वीत असताना ती शाळेची विध्यार्थी मुख्यमंत्री होती. शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने ‘छोटयांचा आवाज’ हे साप्ताहिक चालविले जाते. या साप्ताहिकाची संपादिका म्हणून चंद्राने काम पहिले. ती आणि तिची विध्यार्थी पत्रकारांची टीम ऊ सगावमध्ये आलेल्या वगाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटून बातम्यांचा शोध घेत असत. या साप्ताहिकांमध्ये चंद्राने लिहिलेल्या लेखांचे लोकांकडून कौतुक व्हायचे. दिल्ली च्या निर्भया प्रकरणावर तिने लिहिलेला लेख छोटयांचा आवाज मध्ये तर प्रकाशित केलाच पण त्याचबरोबर वसईतील एका अग्रगण्य स्थानिक दैनिक वर्तमानपत्रा ततिचा लेख प्रकाशित झाला होता, अशी आठवण तिने सांगीतली.

समाजातल्या सामाजिक समस्यांविषयी प्राधान्यक्रमानुसार स्वत:च्या मनातील विचार प्रकट करायला सांगितल्यावर चंद्राच्या मतेठाणे-पालघर सारखे जिल्हे मुंबईला जवळ असूनही येथील शेतकऱ्यांचा योग्य तो विकास झाला नाही. ठाणे-पालघर या जिल्ह्यांतशेतीला वर्षभर सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. मुलींमध्ये भरपुर क्षमता असतात, त्यांनी पुढील शिक्षण घेतले पाहिजे,जी आवश्यक कौशल्याचे शिक्षण घेतले पाहिजे,अ मत तिने मांडले.

विधायक संसदच्या वतीनेवाचा संस्थेच्या (एम्पॉवर) माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी चालविल्या जाणाऱ्या लर्निंग कम्युनिटी उपक्रमात सतत दोन वर्षेनेतृत्व करण्याची व ग्रामीण भागातील मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी झालेल्या उपक्रमांत सक्रीय भूमिका निभावण्याची चंद्राला संधी मिळाली. विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची तिला आवड आहे, चंद्राला आवडलेल्या प्रेरणादायी पुस्तकांमध्ये तिचे प्रेरणास्थान विवेकभाऊ पंडित लिखित ‘माणूस म्हणून जगण्यासाठी’ ,साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ या पुस्तकांचा समावेश असूनयाशिवाय ‘एक होता कार्व्हर’, ‘अकबर- बिरबलाच्या गोष्टीं’ अनेक पुस्तके तीने आजवर वाचली आहेत.

चंद्राच्या वडिलांचे ती इ. ५ वीत असतानाच निधन झाले. वडिलांच्या पश्चात आई कुंदाघरची थोडीफ़ार पावसाळी शेती लावून वमोलमजुरी करून त्यावर कुटुंबाची गुजराण करीत आहे. घरच्या बिकट परिस्थितीमुळे तिच्या मोठया बहिणीने इंद्राने शाळेचे तोंडही पहिले नाही.मोठा भाऊ  महेश २ री पर्यंत शिकला. तोही आता मोलमजुरी करीत आहे. लहान भाऊ सुरज ने ७ वी तून शाळा सोडली आहे, तर दुसरा लहान भाऊ आकाश इ ८ वी मध्ये शिकत आहे.

चंद्रा ला स्वत:ला ४ थी-५ वी त असताना डॉक्टर व्हावे असे वाटत असे.पण आता तिने तिच्या संकल्पात बदल केला आहे. चंद्राला आता भविष्यात मास मीडियाचे उच्च शिक्षण घेऊ न पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचित-शोषितांच्या न्याय्य हक्क आणि सन्मानासाठी काम करायचे आहे, असे तिने सांगितले.

मास मीडियाचे उच्च शिक्षण घेऊनचंद्रा कुंदा कृष्णा जाधव एक सर्वोत्कृष्ट पत्रकार होवो, आणि समाजातील शोषित-वंचितांच्या न्याय्य हक्क व सन्मानासाठीच्या लढयात तिच्या हातून चांगले कार्य होवो, यासाठी आपण तिला शुभेच्छा देऊ यात !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!