प्रविणाताई ठाकूर यांच्या तर्फे ३०० महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटप

नालासोपारा (प्रतिनीधी) : बहुजन विकास आघाडी पक्षाच्या नेत्या व प्रथम महिला महापौर यांच्या वाढदिवसानिमित्त काल २६ नोव्हेंबर रोजी नालासोपारा येथे महिला व मुलींना अत्याधुनिक सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. युवा विकास आघाडीचे नालासोपारा येथील पदाधिकारी नवनाथ पगारे यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.
लक्ष्मीबेन छेडा नगरमधील उद्यानात हा वाटप सोहळा संपन्न झाला. ब.वि.आ.पक्षाचे शहर उपाध्यक्ष अॅड.रमाकांत वाघचौडे, अतुल साळुंखे, नगरसेविका रंजना थाळेकर, सुषमा दिवेकर, आयोजक नवनाथ पगारे, प्रेरणा खानविलकर, पिंकी राऊत- वाघेला, अवंतिका आठल्ये, वनिता गवळी हे मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ब.वि.आ.चे पदाधिकारी राहूल भांडारकर, दिपक नाईक, विली डिसिल्वा यांनी या वेळी उपस्थित महिलांना व मुलींना या उपक्रमाविषयी माहिती दिली.

नगरसेविका सुषमा दिवेकर यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी महिलांनी या पुढेही जागरूक रहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रविणाताई ठाकूर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संविधान दिनाच्या निमित्ताने राज्य घटनेला व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. शहीद जवान आणि दिवंगत पोलीस अधिकारी,कोरोना योद्धे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान आपण जीवदानी मंदिर संस्थेत काम करत असलेल्या महिलांना आणि आज नालासोपारा येथे गोरगरीब महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. आणि हे कार्य असेच या पुढेही चालू राहणार असल्याचे नवनाथ पगारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!