प्रशिक्षित व योग्य पात्रता असणारा उमेदवार उपलब्ध असताना आरोग्य विभाग प्रमुखपदी अपात्र बि.एम.एस अधिकारी का ?

वसई (वार्ताहर) : एका कार्यक्रमामध्ये पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करुन वसई-विरार महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी पदावर अपात्र आणि अकार्यक्षम बि.एम.एस अधिकारी तबस्सुम काझी याांची नियुक्ती योग्य असल्याचे कारण देणाऱ्या वसई-विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची चाललेली धडपड कशासाठी हा प्रश्न  वसई-विरार परिसरातील सर्वसामान्य जनता विचारत आहे.

२० डिसेंबर २०१९ मध्ये नालासोपारा येथे एका आरोग्य विषयी कार्यक्रमात ”सहभागी श्रेत्यांनी विचारलेल्या” ‘ वैद्यकीय अधिकारी पदावर पात्र उमेदवाराची नियुक्ती का करण्यात येत नाही ? ‘ या प्रश्नाला उत्तर देताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी असे म्हटरे होते की ‘आमच्याकडे प्रमुख वैद्यकीय अधिकारी पदावर काम करण्यासाठी पात्र उमेदवार  (M.B.B.S डिग्री होल्डर ) उपलब्ध नाही. नुकत्याच या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार वसई-विरार महापालिकेच्या डेप्युटी आरोग्य विभाग प्रमुखपदी नुकतिच बढती मिळालेले आणि आरोग्य विभागात जुलै २०१९ पासून काम करणारे डॉ.समिर झापर्डे हे केळल M.B.B.S डिग्री होल्डरच नसून वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतयुच्च पात्रता प्राप्त केलेले (MD Clinical Pharmacology ,Post Doctoral Research Fellow, Regenerative Medicine – USA , Anti-microbial Stewardship Fellow, James Cancer Center, USA) डॉक्टर महापालिकेच्या सेवेत रुजू असताना त्यांना डावलून अपात्र आणि वैद्यकीय विभाग प्रमुख पदासाठी आवश्यक असणारी पात्रता नसणाऱ्या, इतकेच नाही तर त्यांच्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातुनही असणाऱ्या नाराजी नंतरही बि.एम.एस अधिकारी तबस्सुम काझी यांना त्या पदावर ठेवण्याचा अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांचा अट्टहास का चालला आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!