प्रासंगिक : लाल मातीची ओढ

‘मित्रा जयंता, हा माझा मुलगा आश्विन… सेक्युरिटी एजन्सी आहे याची… मंत्रालयात त्याची कामे असतात… मदत करा त्याला… ‘
लोकसत्ताचे सर्वांना परिचित आणि देशी खेळांना चालना देण्यांसाठी त्यांनी त्यांची उभी हयात घालविली असे हे आत्माराम मोरे यांना शरद पवार, वसंतदादा पाटील, सुनील तटकरे, अजित पवार यांच्यासारख्या नेते मंडळीबरोबर त्यांची उठबस होती.  पत्रकार आत्माराम मोरे यांचा आश्विन हा मुलगा माझ्या समोर बसला होता. मंत्रालयात सेक्युरिटीची त्याला कामे हवी असतील म्हणून आत्मारामभाऊंनी त्याला आणले असावे, असं मला वाटले. एखाद्या  बाऊन्सरसारखी त्याची बॉडी, टपोरे गोल गोल डोळे पाहून त्याला पाहूनच सगळ्यांची सेक्युरिटी टाईट होत असेल, असं त्याला पाहून वाटले.
एकदोन वेळा आश्विन आत्मारामभाऊ बरोबर  माझ्या कार्यालयात आला होता. त्याला जी मदत पाहिजे होती, त्याप्रकारे मी त्याला मदत करत होतो. नंतर, नंतर अश्विन एकटा माझ्याकडे येऊ लागला.
सध्याकाय करतोस ?… अश्विनला प्रश्न विचारला.
‘नुकतीच सुरवात केली आहे… काही मोठ्या हाऊसिंग सोसायट्या हातात आहेत, तिथे सेक्युरिटी ची माणसं लावली आहेत…’ अश्विनने हळुवारपणे  सांगितले… पण साहेब लवकरच एक मोठं काम होणार आहे… आश्विन बोलत होता.
‘एवढा आत्मविश्वास !, ‘… मी त्याला थोडंस  अजमाविण्याचा प्रयत्न केला.
‘साहेब, विश्वास आहे म्हणून बोलतोय आणि तुमच्या सारख्याच्या सदिच्छा, आशिर्वाद…!’… आश्विन हासत, हासत बोलत होता…
‘चांगलं आहे तर, all the best…’ मी सदिच्छा दिल्या आणि आश्विन निघून गेला.
अश्विन मोरे याने सेक्युरिटीच्या व्यवसायात चांगला जम बसविला होता. हाऊसिंग सोसायटीकडे सुरक्षा रक्षकांची कामे करता करता त्याने         “सेक्युर वन” नावाची कंपनी काढली आणि आज  मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे सुरक्षा रक्षक आहेत. विमानतळावर असलेले त्याचे सुरक्षा रक्षक प्रवाशांची काळजी घेतातच पण त्यांचा आदरातिथ्य होईल, समाधान होईल अशी सेवाही २४ तास उपलब्ध करून देत असतात. प्रवाशांची फसवणूक  करणा-यांना लुटारूंना त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. हाजला जाणा-या मुस्लिम बांधवांना दरवेळी सर्व प्रकारची सेवा त्याची सुरक्षा रक्षक आणि उत्तमरीत्या सेवा देत असल्याने हाज कमिटीच्या पदाधिका-यांनी आश्विन मोरे व त्याच्या टीमला विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे.
आश्विनचे शिक्षण मुंबईत झाले असले तरी तो मूळचा कोकणातील दापोलीचा आहे. मुंबईच्या गर्दीत आणि चोवीस तास व्यस्त राहावे लागत असल्याने तो गावी हवापालट करण्यासाठी जातो. अशावेळी गावातील गावकरी मुंबईला चाकरी करण्यासाठी जातात. त्यामुळे गावात वयोवृद्ध माणसं घरात दिसतात. गावाला वृद्धाश्रमाचे स्वरूप आलेले पाहून आश्विनच्या डोक्यात विचार, कल्पना, संकल्पना घोंघावू लागले. कोकणाच्या लालमातीत सोन दडलेलं आहे पण कष्ट करण्याची तयारी नाही. गणपती, होळी आणि लग्न समारंभाला येण्यापूर्ती गाव  नुसतं नावाला राहिले  होते. मुंबईत उद्योगव्यवसाय सारखं काही तरी गावी केल्यास आणि गावातील लोकांना कामे व पुरेसा पगार मिळाल्यास तरुण मुलांना मुंबईपेक्षा गावाकडे कायम ओढा राहील, असा काही उपक्रम सुरू करण्याचा त्याने विचार केला. आश्विनच्या गावात त्याची थोडी फार जमीन होती. त्यात आंबा, काजू, नारळाची झाडे होती. आंब्याच्या बागेतून चांगले उत्पन्न घेऊन काही आंबे तो निर्यात करतो. अशा या छोट्या व्यवसायातून त्याला हळदीचे पीक घेण्याची कल्पना सुचली. दोन नारळाच्या झाडाच्यामध्ये त्याने हळद लावली आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने लावलेली हळद मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊ लागले. पश्चिम महाराष्ट्रात होणारी हळद ही पिवळ्या रंगाची असते तर अश्विनने पिकविलेली हळद लाल व सोनेरी आहे कोकणाच्या मातीत लोह जास्त प्रमाणात असल्याने कोकणातील हळदीचा रंग लाल रंगाची असते.  अश्विन याचे बरेचसे नातेवाईक आणि मित्र अमेरिका, कॅनडा, लंडन परदेशात राहणारे आहेत. त्यांच्याकडून या हळदीला मागणी आहे. तेथील एका परदेशी व्यक्तीने या हळदीवर प्रयोग करून ही हळद आरोग्याला उपयुक्त असल्याने त्याने काही टन हळद निर्यात करण्यास सांगितले आहे. सध्या ही मागणी पूर्ण करता येत नसले तरी भविष्यात चार-पाच कंपन्यांकडून ऑर्डर्स मिळाल्या तर नक्की ही मागणी पूर्ण करता येईल, असा त्याने विचार केला आहे.
 आश्विन  याने आठ एकर जमीन घेऊन तिथे हळद उत्पन्न करण्याचं विचार केला आहे. त्याच्या या नव्या उपक्रमामुळे गावातील लोकांना कामे मिळालीत शिवाय मुंबईतून येणा-या पैशाची त्यांना आता वाट पाहावी लागत नाही. गणपती, होळी साजरा करण्यासाठी कर्जही काढावे लागत नाहीत.ही परिस्थिती बदलल्याने गावक-यांना पैसार बचतीची सवय लागली आहे. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे गावात राहून आपल्या माणसांना न भेटणा-याना आपली दुरावलेली माणसं आश्विनच्या शेतात काम करताना त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या आहेत, ही फार मोठी जमेची बाजू आहे.  हळदीच्या उत्पादनाच्या माध्यमातून दुरावलेली माणसं एकत्र आलीत, एकमेकाना ओळखू लागली याच त्याला अप्रुफ वाटतं. उद्योग व्यवसाय करण्याचा आणि गाव जागतिक स्तरावर नेण्याचा ध्येय उराशी ठेवणारा आश्विन मोरे हा कोकणावासीयांना साद घालतोय. कोकणात बरंच काही करण्यासारखं आहे, मुंबईकडे डोळे लावून बसण्यापेक्षा डोळस व्हा कोकणासाठी… दुरावलेली माणसं आणि मने एकत्र आणू या आणि कोकणातील समृद्धी  पुढील पिढीसाठी जपून ठेवू या, असे आश्विन याचा प्रत्येक कोकणवासीयांना सांगणं आहे.
त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आहे, कोकणात सांगली, सातारा, कोल्हापूर येथून दूध येते. कोकणात दुग्धव्यवसाय सुरू करून कोकणवासीयाना स्वस्त दूध पुरवठा आणि गावतील लोकांना रोजगार निर्माण करून देणे हे त्याचे उद्धिष्ट आहे आणि ते तडीस नेण्याचा त्याचा संकल्प आहे. आश्विनसारखी आणखी ध्येयवादी माणसं कोकणात निर्माण झाली तर कोकणातून लालपरी एसटी हद्दपार होईल आणि कोकणी लोक  मुंबईला व इतरत्र विमानाने प्रवास करताना दिसतील.
गावाकडची ओढ, गावाकडची माणसं आणि त्यांचा विकास हे डोळ्यासमोर ठेवून आश्विन वाटचाल करीत आहे. कोकणाने महाराष्ट्राला अनेक नररत्ने दिलीत, पण ती राजकीय, साहित्यिक, कलाकारांच्या स्वरूपात… आता कोकणाला उद्योग व्यवसायात उभारी घेणारी माणसं पाहिजेत… आश्विनने श्रीगणेशा केला आहे… त्याला खूप, खूप शुभेच्छा…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!