प्रेम व एकोप्याचा अद्भुत संगम ‘निरंकारी संत समागम’ – संदीप राणा

संत निरंकारी मिशनचा ७२वा वार्षिक निरंकारी संत समागम १६,१७ व १८ नोव्हेंबर, २०१९ रोजी ‘निरंकारी आध्यात्मिक स्थळ’, समालखा, जी.टी.रोड, हरियाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात प्रस्तुत लेख आपल्या वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे.

१६,१७, व १८ नोव्हेंबर, २०१९ रोजी निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे ७२वा वार्षिक निरंकारी संत समागम सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ६०० एकराच्या मैदानांवर साजऱ्या होणाऱ्या या संत समागमामध्ये भारता व्यतिरिक्त जगभरातील लाखो भाविक भक्तगण उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. या समागमाची पूर्वतयारी दोन महिन्यांपूर्वीच अत्यंत सुनियोजित व सुंदर रीतीने सुरु झालेली आहे. जवळपास ४ वर्ग कि.मी. क्षेत्रावर भाविक भक्तगणांसाठी तंबूंची व्यवस्था करण्यात येत असून या संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी उजेडासाठी लावण्यात येणाऱ्या विद्युत बल्बच्या रांगांनी जणू काही या भागात एक वेगळेच शहर वसले आहे की काय असा भास होतो. इथे मोफत लंगर (महाप्रसाद) उपलब्ध आहे. येथील कॅन्टीन्समध्ये चहा आणि खाद्यपदार्थ अत्यल्प दराने उपलब्ध असतात. स्वच्छता गृह इत्यादींची व्यवस्था अगदी सुंदर आणि विस्तृत स्वरुपात करण्यात आलेली आहे.

हा संत समागम मागील 70 वर्षांपासून दिल्लीतील वेगवेगळया ठिकाणांवर आयोजित होता आला आहे. कधी लाल किल्ल्याच्या पाठीमागील मैदानांवर, कधी इंडिया गेटच्या मैदानांवर आणि मागील बऱ्याच कालावधीपासून बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात बुराड़ी रोड स्थित समागम मैदानांवर होत आला आहे. सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत बुराड़ी रोडवर झालेला ७०वा संत समागम हा शेवटचा होता. त्यानंतर मागील वर्षी वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात ७१वा वार्षिक निरंकारी संत समागम पहिल्यांदाच मिशनच्या स्वत:च्या जागेवर जी.टी.रोड, समालखा येथे आयोजित करण्यात आला. यावर्षी त्याच ठिकाणी ७२वा संत समागम आयोजित करण्यात आला आहे.

निरंकारी संत समागमामध्ये भाविक-भक्तगणांची मोठया प्रमाणावर उपस्थिती असूनही त्यामध्ये कधीही चेंगराचेंगरीसारखे प्रकार झाले नाहीत. कारण सगळे स्वयंशिस्तीत प्रभुचे गुणगान करत आनंद लुटत असतात. लंगर, कॅन्टीन किंवा स्वच्छता गृह अशा सर्व ठिकाणी रांगा लावतात. संत समागमामध्ये सर्व व्यवस्था निरंकारी सेवादल आणि अन्य भक्तमंडळींकडून केली जाते. मग ते लंगर तयार करायचे असो, भांडी स्वच्छ करणे असो, कॅन्टीनमध्ये सेवा करणे, रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण इत्यादी सर्व सुविहित आणि पूर्वनियोजित असते. यामध्ये संत निरंकारी सेवादलाचे मुख्य योगदान असते. समागमामध्ये वेगवेगळया भाषा बोलणारे लोक इतक्या प्रेमाने व एकोप्याने राहतात की, जणु काही प्रेम व एकोप्याची एक अद्भुत दुनियाच वसलेली आहे. इथे जरी कोणी कोणाला व्यक्तीश: ओळखत नसले, वेशभूषा साराखी नसली, भाषा वेगवेगळी असली तरीही सगळे एकमेकांबरोबर मिळुन-मिसळून राहतात. संत समागमामध्ये वर्ण, भाषा, देश, गरीब, श्रीमंत असा कोणताच भेदभाव आढळत नाही.

वर्तमान समयाला पृथक झालेल्या मानवतेला हाच संदेश देण्याचा विडा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी उचलला आहे. निरंकारी मिशनचे मुख्य पुस्तक संपूर्ण अवतार बाणी मध्येही बाबा अवतारसिंहजींनी हेच नमूद केले आहे, की गुरसिख नूं जद गुरसिख्चा मिलदा, वेख के चा चढ़ जांदें नें, इक दूजे दे पैरां उत्ते न्यों-न्यों सीस झुकांदें ने. वर्तमान काळात मानवता टिकवण्यासाठी आणि एकमेकांमध्ये प्रेमाची भावना रुजविण्यासाठी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रात-दिवस एक केला आहे.

निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित या संत समागमामध्ये या तिन्ही दिवश्याी हाच संदेश दिला जाईल, की अवघे जग एकाच प्रभु परमात्म्याची उपज असून त्या एका निराकार प्रभु-परमत्म्याला जाणूनच एकतेची भावना आमच्या मनामध्ये येऊ शकेल. एकमेकांशी प्रेम, नम्रतेने व्यवहार करण्यााठी एकमेव साधन आहे ते म्हणजे ब्रह्मज्ञान. जेव्हा जगामध्ये अशी प्रेमाची भावना निर्माण होईल तेव्हा हे जग सुंदर बनेल आणि जगामध्ये रोज वाढत चाललेली द्वेषाची आणि तिरस्काराची भावना संपून जाईल, मानवतेची स्थापना होईल.  (लेखक संत निरंकारी मिशन का अनुयायी है)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!