फिजिकल इफिशिएन्सीचे महत्व जाणणारे क्रीडाप्रेमी पंकज भास्कर ठाकूर

विरारचे आणि प्रसिद्ध ठाकूर परिवारातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असणारे सदाबहार नेते पंकज भास्कर ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त (१ नोव्हेंबर) हार्दिक शुभेच्छा देताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख होणे अपरिहार्य ठरते.

फिटनेस काॅन्शस पंकज : लहानपणापासून असणारी क्रिकेट आणि कॅरम खेळांची आवड मोठेपणी सुद्धा जोपासली गेली. क्रिकेट आणि बॅडमिंटन या खेळांमुळे पंकज ठाकूर हा क्रीडापटू सतत सरावात आणि सरावासाठी मैदानात होता. मैदानात रहायचे असेल तर फिजिकल इफिशिएन्सीचे व फिटनेसचे महत्व त्याने वेळीच जाणले होते. कॅरम या खेळाच्या सरावात कौशल्य आणि मानसिक संतुलन,लक्ष केंद्रित करणं, श्वासांचा योग्य उपयोग करणं, अशी झलक त्याने दाखवून दिली होती. दोन्ही ठिकाणी हा खेळाडू आक्रमक आणि बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत होता. हेच गुण पंकजला पुढे फार मोठे यश देऊन गेले आहेत.घरात राजकीय वातावरण होते आणि जोवर वडील कै.भास्करभाऊ ठाकूर हे विरार या गावाचे आणि शहराचे नेतृत्व करत होते तोवर पंकज ठाकूर यांनी आपले शिक्षण, प्रशिक्षण, व्यापार आणि ठाकूर परिवारातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कामात लक्ष घातले. याच दरम्यान पंकज ठाकूर यांचे ज्येष्ठ बंधू आप्पा तथा हितेंद्र विष्णू ठाकूर हे १९९० ला वसईचे आमदार झाले. पंकज ठाकूर यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. नगरपरिषद आली आणि उमद्या कार्यकरर्त्यांची एक फळीच विरार येथे तयार झाली. यात पंकज ठाकूर, अजीव पाटील, जितेंद्र शहा, प्रफुल्ल साने, हेमंत म्हात्रे, रमेश कोटियन, अजय खोखाणी, प्रवीण राऊत, प्रदीप तेंडोलकर, अजय सेठ, किशोर नाईक, उमेश नाईक, प्रशांत राऊत असे अनेकजण होते. सर्वांची नावं नमूद करणे शक्य नाही, इतकी मोठी ती यादी आहे. पंकज ठाकूर यांनी नगरपरिषद आणि महानगरपालिकेत नगरसेवक पद, प्रभाग समिती सभापती पद यशस्वीरित्या सांभाळले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या व राज्य कॅरम संघटनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. यंगस्टार्स ट्रस्ट चा क्रीडा विभागाचा कोणताही उपक्रम असो, पंकज ठाकूर यांचा सहभाग हा असणारच. पंकज ठाकूर यांना जवळून ओळखणारे एका गोष्टीवरून त्यांचे कौतुक करतात ते त्यांच्या फिटनेस काॅन्शस नेचर वरुन. अत्यंत रोखठोकपणे बोलणे, बोलताना वरिष्ठांना आदर देण्याचे भान राखणे हे एक स्वभाव वैशिष्टय ही पंकज ठाकूर यांची खरी ओळख.क्रीडापटू म्हणून काम करताना त्यांनी विरार सह वसईतालुक्यातील मैदाने विकासाच्या कामांवर आपले लक्ष केंद्रित केले. दर्जेदार क्रिकेट विकसित करायचे असेल तर प्रत्येक शहराला किमान एक तरी “टर्फ विकेट” असलीच पाहिजे असे आग्रही धोरण नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या कामकाजात आम. हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले. आज विरार, नालासोपारा आणि वसई येथे जी क्रिकेट मैदानं उपलब्ध आहेत ती पंकज ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे. विरार येथे जिवदानी मंदिराच्या पायथ्याशी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी क्रिकेटपटूंना लाभदायक ठरते आहे असे एक काम त्यांनी केले आहे. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ कै.भास्कर ठाकूर क्रिकेट अकादमी सुरु केली. आजवर हजारो विद्यार्थी क्रिकेटपटूंना येथे प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे.

पृथ्वी शाह सुद्धा घडला : आज अवघ्या क्रिकेट जगतात ज्या युवा फलंदाज पृथ्वी शाहची चर्चा आहे तो धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शाहची सुरुवात (अगदी लहान वयात) सुद्धा याच मैदानावर  झाली आहे. प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी त्याच्याकडून कसून सराव करुन घेतला होता. अर्थात अनेक मुला-मुलींनी विविध स्पर्धा गाजवताना या क्रिकेट अकादमीचा नाव लौकीक वाढवला आहे. अनेक नेट ची सोय असणारी जिवदानी मंदिराच्या पायथ्याचे आणि यशवंत नगर विरारचे  अमेय क्लासिक क्लबचे मैदान. दोन्ही ठिकाणी आजही शेकडो प्रशिक्षणार्थी एकाच वेळी नेट प्रॅक्टिस करताना दिसतात. वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात पंकज ठाकूर महत्वाची भूमिका बजावतात. दर वर्षी क्रीडा विभागाच्या उदघाटन आणि समारोप सोहळ्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील किर्तीचे क्रीडापटू सहभागी करुन घेण्यासाठी ते पुढाकार घेत आले आहेत.विश्व विख्यात क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची वसई महोत्सव आणि विरारला राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने भेट घडवून आणणे हे विशेष उल्लेखनीय आहे. एकाच वेळी नगरसेवकपद, पक्ष संघटनेचे काम, विविध क्रीडा संघटना आणि मंडळांशी संपर्क, तालुका आणि जिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन, महोत्सवात गरजेची असते त्या पूर्व तयारीत सहभाग, हे सगळं करत असताना आपल्या वैयक्तिक उद्योग व्यवसायात सुद्धा लक्ष देणे असे सतत व्यस्त असणारे पंकज ठाकूर यांच्याकडून नव्या पिढीच्या व उमेदीच्या कार्यकर्त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. तेवढयाच प्रमाणात असंख्य उभरते क्रिकेटपटू आणि कॅरमपटूत्यांच्याकडून त्या आहेत.राजकारणात त्यांचा अनुभव आणि नालासोपारा या शहराशी त्यांचा थेट संपर्क पाहता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना नालासोपारा पश्चिम भागात “प्रभारी” म्हणून नियुक्त केले आहे. निवडणूक कोणतीही असो चांगला निकाल देणार या आत्मविश्वासाने त्यांनी ही जबाबदारी सुद्धा उत्तमरित्या सांभाळली आहे.

महापालिका निवडणुकीत टीम पंकज ठाकूर चांगलीच यशस्वी झाली आहे. विरार पाठोपाठ नालासोपारा पश्चिम भागात आपला पक्ष शत प्रति शत असा निर्भेळ आनंद पक्षाला जो मिळाला आहे त्यात प्रभारी नेतेपंकज ठाकूर यांचेही अनमोल असे योगदान आहे. सध्या ते ठाकूर परिवारातील युवा नेत्यांचे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे “मोठे भाऊ” या भूमिकेत रममाण आहेत. नेहमी प्रमाणे व्यस्त आहेत. अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही सामाजिक परिस्थितीत, सामाजिक संकट काळात ते विविध ट्रस्ट च्या माध्यमातून संकटग्रस्त व गोरगरिबांना मदत करण्यात आघाडीवर आहेत. भयाण महापूर परिस्थितीकाय किंवा आत्ताचा लाॅक डाऊन काळ. त्यांनी अन्न दान, धान्य वाटप, तयार भोजन वाटप आरोग्यविषयक मदत करणे असो. बदलत्या आरोग्य परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे ते रक्तदान आणि प्लाझ्मा दान. याच जाणीवेतून आणि सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून आजच नव्हे तर गेले काही महिने ते मदत कार्यात सुद्धा मोठ्या उत्साहाने पुढे आहेत. अनेकांचे आशिर्वाद आणि सदिच्छा घेत घेत….आजचा हा वाढदिवस एक निमित्त आहे त्यांच्या “फिटनेस काॅन्शस नेचरची तारिफ” आणि चर्चा कायम राहिली आहे.

ऍड. रमाकांत वाघचौडे, गेट टुगेदर ग्रुप-नालासोपारा

  

    .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!