‘‘फिर एक बार मोदी सरका’’ हेच आमचे धेय्य – माजी आ.हेमेन्द्र मेहेता 

वसई, दि.१७ (वार्ताहर) : “फिर एक बार मोदी सरकार” हेच आमचे धेय्य असून, सुरु केलेल्या लोकोपयोगी संकल्पनाना मूर्त स्वरूप देण्यासाठी, देशाला विकासाच्या नव्या क्रांतीकडे नेण्यासाठी  भारतीय जनता पार्टीसह एनडीए सरकारला पुन्हा निवडून द्या, असे आवाहन भाजपाचे नेते व माजी आमदार हेमेन्द्र महेता यांनी वसईत केले.
वसई रोड भारतीय जनता पार्टीचा विजय संकल्प मेळावा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपाचे वरीष्ठ नेते व माजी आमदार हेमेन्द्र महेता उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्व. चिंतामण वनगा यांच्या आठवणीना उजाळा देत, अडीच लाखाने वनगासाहेबांचा विजय झाला होता यावेळी पाच लाखांपेक्षा जास्त मताने आपला विजय होणार, असा आशावाद व्यक्त केला. हितेंद्र ठाकूर आणि त्यांची कंपनी मुंगेरीलालची स्वप्ने पाहत आहेत. विकास या शब्दाचा फक्त इमारती बंधने असा आगळा वेगळा अर्थ लाऊन बहुजन विकास आघाडीने वसई तालुक्यात काँक्रीटचे अनियोजनबद्ध जंगल उभे केले. त्यांच्या पापांचा घडा आता भरला असून त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज अनधिकृत बांधकामाची वसई अशी या शहराची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाली आहे.
यावेळी वसई रोड मंडळ अध्यक्ष उत्तमकुमार नायर यांनी बोलताना, गुंडशाही व बांधकाम व्यवसायिकांना पाठीशी घातल्याने  अनधिकृत बांधकामे वसईत निर्माण झाली.  त्यातून आलेल्या पुरसदृश पुरस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडीचा एकही नगरसेवक मदतीला उतरला नव्हता.
भाजपा प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी यांनी बोलताना बूथ प्रमुखांनी घरोघरी जाऊन पक्षाचा प्रचार व योजना समजवून सांगण्याचे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमास भाजपा वरीष्ठ नेता दत्ता नर, आम्रपाली साळवे, विभाग सचिव अपर्णा पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. सूत्रसंचालन रामानुजम यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश सरवणकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!