फुलाला जन्मापासून मरणापर्यंत मार्केट मिळते – सुभाष भट्टे

वसई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांनी आता फुलशेतीकडे वळायला हवं आजच्या काळात फुलाला जन्मापासून मरणापर्यंत मोठी बाजारपेठ असून यात खर्चही कमी असल्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न आपल्याला मिळू शकते असे प्रतिपादन वसंतराव नाईक फुल शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी सुभाष भट्टे यांनी वसई शेतकरी सोसायटी चा शेतकरी मार्गदर्शन मिळाव्यात केले.

वसई शेतकरी सोसायटी तर्फे शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोसायटीच्या देवतलाव येथील सभागृहात करण्यात आले होते. या शिबिराला कोसबाड कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे, वसंतराव नाईक, फुलशेती पुरस्कार प्राप्त सुभाष भट्टे हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. कार्यक्रमाला सोसायटीचे चेअरमन अक्षय राऊत, सचिव समीर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन यांनी केले. त्यांनी सोसायटीचा आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला तर संस्थेच्या शाखा यांनी पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या रोगावर उपाय आणि त्याचे व्यवस्थापन यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

त्यांनी यावेळी सांगितले की तांत्रिक ज्ञान आणि अनुभवाची जोड असल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देऊ  शकते. सध्या श्रीलंकेतील पांढरी माशीचा प्रादुर्भाव आपल्याकडे मोठया प्रमाणावर झाला आहे, यावर जैविक खताचा उपाय करण्याबरोबरच निसर्गातील किडे मारणारे या रोगाचा नायनाट करू शकतात. हे नारळा बरोबरच इतर पिकांसाठी घातकच आहे. नारळामुळे मधमाशीचे मोठया प्रमाणात संरक्षण होते आणि त्याचे उत्पादनही मोठया प्रमाणावर होते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. भुंगा कीड आणि इतर किडीमुळे नारळाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

फुल शेतीवर बोलताना वसंतराव नाईक फुल शेती पुरस्कार प्राप्त सुभाष भट्टी यांनी सांगितले की, ”फुल शेतीमधील फुलाचा उपयोग जन्मापासून मृत्यूपर्यंत होत असल्याने त्याला मोठे मार्केट आहे. आता शेतकऱ्यांनी फुल शेतीकडे वळावे” असा सल्ला दिला. त्यातच फुलशेतीला मुंबईची  बाजारपेठ जवळ असल्याने त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होऊ  शकतो. सध्या वसई तालुक्यात सोनचाफा, पिवळा चाफा याला मोठी मागणी आहे. या पिकाबरोबरच आंतरपीक म्हणून तुळस, सुरण आणि आळू ही पिके घ्यायलाच हवी. पिवळा चाफ्यावर रोग येत नसल्याने त्याचे उत्पादन मोठया प्रमाणावर होते, याचा याबरोबरच जास्वंदीच्या फुलालाही मोठी मागणी असल्याने त्याच्या लागवडी शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळू शकतात, असे तर पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन समीर पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!