बडतर्फ केलेल्या अतिक्रमण विभागातील १२७ कर्मचारी पुन्हा सेवेत समाविष्ट होणार !

वसई (वार्ताहर) : कोरोनाच्या वैश्विक संकट चालू असताना लॉकडाऊनच्या काळात वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांनी शासकीय संकेत तथा सूचना पायदळी तुडउन अतिक्रमण विभागातील १२७ कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून बेरोजगार केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष राजारामजी मुळीक ह्यांनी ह्याबाबत ताबडतोब आयुक्तांना भेटून ह्या कामगारांच्या बद्दल लेखी तक्रार करून विचारणा केली होती, तसेच ह्याची माहीती जलसंपदा मंत्री, प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे ह्यांना भेटून लेखी पत्र देऊन ह्या कामगारांची व्यथा मांडली होती. ह्यांनंतर ह्या सर्व कामगारांनी खासदार सुप्रियाताई सुळे तसेच कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे साहेब ह्यांची भेट घेतली होती.
सदर बाबतीत खा.सौ.सुप्रियाताई सुले यांनी आयुक्त (वसई-विरार यांचेशी संवाद साधुन कामगाराना पुन्हा नोकरीवर घेण्याविषयी सूचित केले होते, त्याच बरोबर राज्यमंत्री ना. प्राजक्तजी तनपुरे याना संबधित बाबतीत लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने प्राजक्तजी तनपुरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आयुक्तांना १२७ कामगार अन्यायकारक रीतीने बडतर्फ केले असल्याने त्यांना पुन्हा कामावर रूजू करून घ्यावे असे निर्देश देऊन ठेका कर्मच्यारीना कायमस्वरूपी कामावर घेणे संदर्भात विचार करणे संदर्भात सूचना दिल्या होत्या.
शेवटी आदरणीय खा.सुप्रियाताई सुले यांच्या सूचना तथा निर्देश आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष राजाराम भास्कर मुळीक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानी पालिका प्रशासनाला त्या प्रकारे निर्णय घ्यावा लागला. हे सर्व कामगार दिवाळी पूर्वी कामावर रूजू होतील, त्यांना न्याय मिळाला आहे.

आज ह्या सर्व कामगारानी राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय सनसिटी वसई येथे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक ह्यांची भेट घेतली आणि समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!