बविआ नगरसेवकाला तडीपार करण्याची मागणी

वसई (वार्ताहर) : बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सिताराम गुप्ता याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

वसईच्या पुर्वेकडील जयेश मेहता यांच्या कार्यालयावर बळजबरीने कब्जा करून त्यांना मारहाण केली होती.या घटनेला पाच महिने उलटल्यानंतरही पोलीसांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे मेहता यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे तुळींज पोलीस ठाण्यात नगरसेवक सिताराम गुप्ता विरोधात ४५२,३४२,१४३,५०४, ५०६,४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिताराम गुप्ता याच्या विरोधात यापुर्वीही अशाचप्रकारचे गुन्हे नालासोपारा पोलीस ठाण्यात नोंदवले गेले आहेत.त्यामुळे गुप्ताला पोलीसांनी नाही तर बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर यांनी तरी पक्षातून तडीपार करावे अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!