बविआ “हाता’’ वर लढणार !

वसई (वार्ताहर) : गेली ३० वर्षे बहुजन विकास आघाडीचे असलेले शिट्टी हे निवडणूक चिन्ह बहुजन म्हापक्षाने पळवल्याने आता काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय “बविआ’ ने घेतला आहे. 
वसई-विरार मध्ये गेल्या तीन दशकांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची निर्वीवाद सत्ता आहे. सुरुवातील काँग्रेस पक्षातून ठाकूर विधानसभेवर निवडून गेले आणि नंतर पक्ष सोडल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक त्यांनी चष्मा चिन्हावर लढवल्या होत्या. नंतर शिटी चिन्ह पक्षाला मिळाले आणि तीच त्यांची ओळख बनली होती. शिटी चिन्ह घेउनच त्यांनी सर्व नगर परिषद आणि पाठोपाठ सलग तीन वेळा महापालिका बहुमताने काबीज केली. पक्षाचा खासदार आणि तिन्ही आमदार शिटी चिन्हावर निवडून गेले होते. आता बहुजन म्हापक्षाने शिटी चिन्ह केंद्री स्तरावर नोंदणी केल्याने पक्षाची अडचण झाली होती. तरी पक्षाने बहुजन म्हापक्षाची समजूत काढून त्यांचा पाठिंबा मिळवला होता. मात्र मंगळवारी अचानक बहुजन म्हापक्षाने पाठिंबा काढून घेतला आणि बहुजन विकास आघाडीला शिटी चिन्हाला मुकावे लागले.
आता कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायची , असा प्रश्न  पक्षापुढे होता. बविआची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकप या पक्षांबरोबर युती आहे. परंतु पक्षाने हात चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची माहिती दिली. आम्ही हात चिन्हावर निवडणूक लढवू आणि आमच्या विरोधात खेळी करणाऱ्या शिवसेनेला पाणी पाजू, असे या नेत्याने सांगितले. बहुजन म्हापक्षाचे अध्यक्ष शमशुद्दीन खान हे शिवसेना नेत्यांना भेटल्याचे छायाचित्र उपलब्ध झाल्याने या षडयंत्रामगे शिवसेना असल्याचे सिद्ध झाल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
चिन्ह बदलले तरीही 
पक्षाचे सांघटक सचिव आणि प्रवक्ते आजीव पाटील यांनी आमच्यापुढे अनेक पर्याय असल्याची माहिती दिली. तीस वर्षात तीन आम्ही निवडणूक चिन्ह बदलले आणि प्रत्येक वेळी बहुमताने जिंकून आलो., असे पाटील यांनी सांगितले. या मतदारसंघातील सर्व मतदार हा सुशिक्षित आहे. चिन्ह बदलल्याने ते गोंदळणार नाहीत, असे पाटील यांनी सांगितले. बहुजन म्हापक्षाने आम्हाला अर्ज आणि इतर कागदपत्रे दिलेली होती. परंतु शिवसेना घाबरली असून डाव खेळात पक्षाला फितवले आणि आमचे चिन्ह काढून घेतले, चिन्ह बदल्याने काहीच फरक पडणार नाही, असा दावा त्यांनी केला.
शशुद्दीन खान अज्ञातवासात 
बहुजन म्हापक्षाचे अध्यक्ष शमशुद्दीन खान यांनी शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळवल्यापासून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. माझ्या जीवाला धोका असल्याचे खान यांनी तेव्हा सांगितले होते. आता त्यांनी बविआला पाठिंबा काढून घेतल्यानंतर ते अज्ञातवासात रवाना झाले आहे. त्यांच्या कार्यालयात संपर्क केला असता त्यांचा ठिकाण कळू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!