बहुजन महापार्टीचे खान यांच्या भावावर ४२० चा गुन्हा दाखल

वसई (वार्ताहर) : बविआची शिट्टी गुल करून अल्पावधीतच प्रसिध्द झालेल्या बहुजन महापार्टीचे शम्शुद्दीनखान यांच्या मोठया भावावर  ४२०आणि ४६५ कलमान्वये गंभिर गुन्हे दाखल झाले आहेत. वसई न्यायालयाच्या आदेशानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे बांधकाम वर्तुळात खळबळ माजली आहे.

२० वर्षे शिट्टी निशाणीवर निवडणूक लढवणाऱ्या वसईतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीची शिट्टी निशाणी गुल करून बहुजन महापार्टीचे शम्शुद्दीन खान यांनी राजकिय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.खान यांनी शिट्टीवर दावा करून यंदाच्या लोकसभा निवडणूकीत आपला उमेदवार उभा केल्यामुळे बहुजन विकास आघाडीटी शिट्टी निशाणी गोठवण्यात आली होती.त्यामुळे खान चर्चेत आले होते.आता खान पुन्हा एकदा खान मात्र,वेगळया कारणास्तव चर्चेत आले आहेत.शम्शुद्दीन खान यांचे मोठे बंधु जावेद खान यांच्यावर ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४७१, ३४ कलमान्वये तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोखिवरे सर्वे क्र.१२७ येथील प्रकल्पातील २३ हजार चौ.फुट जागा जावेद खान आणि त्यांचे सहकारी नकुल सुतार व धर्मेश गांधी यांनी बांधकाम व्यावसायिक संजय जोशी यांना विकण्याचा करार केला होता.वसई-विरार पालिकेने  १९२६.४४ चौ.मी.इतका एफ.एस.आय.दिला असताना खान,सुतार आणि गांधी यांनी त्यावर बनावट कागदपत्रे तयार करून ३६०१.४० चौ.मी.ची नोंद करून तो जोशी यांना विकला.ही फसवणूक लक्षात आल्यावर जोशी यांनी योग्य एफ.एस.आयची मागणी या तिघांकडे केली.मात्र, त्यांनी एफ.एस.आय.अथवा व्यवहारातून दिलेले पैसेही परत न करता जोशी यांना दमदाटी केली.

त्यामुळे जोशी यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली असता,जावेद खान,नकुल सुतार आणि धर्मेश गांधी यांच्यावर ४२०,४०६,४६५,४६७,४७१,३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद खान यांचे धाकटे बंधु शम्शुद्दीन खान यांनी बविआची शिट्टी गुल केल्यामुळे ते चर्चेत आले होते.तर जावेद खान हे जोशी यांचे पैसे आणि जागा गुल करून चर्चेत आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!