बहुजन महापार्टीचे समर्थन बहुजन विकास आघाडीला

नालासोपारा : ऑॅल इंडिया बहुजन महापार्टी या राष्ट्रीय पक्षाने या लोकसभा निवडणुकीत पालघरला आपला उमेदवार उभा न करता पक्षाचा बिनशर्त पाठिंबा लोकनेते आम. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी पक्षाला दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दिन खान यांनी हा निर्णय काल पत्रकार परिषदेत जाहीर केला.

आचोळे रोड भागातील गैलक्सी हॉटेल हॉलमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत ब.वि.आ.पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उप महापौर उमेश नाईक, महापौर रुपेश जाधव, शमशुद्दिन खान,  जावेद खान, हनुमंतराव देवकर हे मान्यवर उपस्थित होते. प्रभाग समिती सभापती निलेश देशमुख यांनी उपस्थित पत्रकार व मान्यवरांचे स्वागत केले.

आपण आपल्या पक्षाचा पाठिंबा बहुजन विकास आघाडी पक्षाला देत आहोत आणि शिट्टी ही निशाणी सुध्दा आम्हा महाआघाडीला देत असल्याची माहिती शमशुद्दिन खान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. देशात व राज्यात आम्ही कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी केली नसून फक्त पालघर मतदार संघात आमची ब.वि.आ.या पक्षाशी मैत्री आहे. कारण एकच आमचा पक्ष धर्मनिरपेक्षता या धोरणाने काम करतो. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊनपुढे जात समाज कार्य करणारा व परिणाम देणारा ब.वि.आ. हा पक्ष आहे, असे खान पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खान म्हणाले.

एकूण लहान मोठया 56 पक्ष व संघटनांनी ब.वि.आ.शी आघाडी केली आहे. आणि युतीचा इथे मोठा पराभव होईल. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या परवानगीने मी हा निर्णय जाहीर करतो आहे. शिट्टी याच निशाणीवर आम्ही लढणार आहोत,ही निवडणूक जिंकणार आहोत.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापौर रुपेश जाधव, माजी उप महापौर उमेश नाईक यांनीही या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. ब.वि.आ.पक्षाचे शहर उपाध्यक्ष रमाकांत वाघचौडे यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे शिवाय बहुभाषिक प्रतिनिधी या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!