बहुजन विकास भवन झाले हजारोंसाठी अन्नछत्र !

नालासोपारा (प्रतिनिधी) : आम.क्षितीज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गोरगरीब व लाॅक डाऊन परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या व्यक्तिंना मोठी मदत करण्याचे काम नालासोपारा येथे सुद्धा ब.वि.आ.पक्षाच्या वतीने पद्धतशीरपणे चालू आहे. अशा या परिस्थितीत भुकेलेल्या अन्न आणि तहानलेल्या पाणी. सध्या हीच तातडीची मदत आणि
हाच खरा आधार त्यांना मोठा आहे. ही गरज लक्षात घेऊन बहुजन विकास आघाडीने नालासोपारा येथील विकास भवन अन्न छत्रात परावर्तित केले आहे.

या ठिकाणी दररोज सकाळी व संध्याकाळी हजारो गरजू परिवारांना पाठविण्यासाठी अन्न शिजते. ते जिकडून मागणी आहे तिकडे ते रवाना केले जाते.
साधारणपणे २२ हजार व्यक्तिंना या चविष्ट आणि ताज्या खिचडीचा लाभ मिळतो आहे. नगरसेवक किशोर पाटील यांनी ही माहिती दिली.
अन्न तयार करणारी टीम, कच्चा माल ताब्यात घेणारी
व वाहतूक व्यवस्था बघणारी टीम, आहार वितरण करण्यात मागणीची नोंद घेणारी टीम, भटारखाना स्वच्छता, मास्क व डिस्टन्स चेकिंग टीम, दररोज वापरात येत असलेल्या भाज्या, मसाले, तेल, डाळी, कांदा- बटाटा याची नोंद ठेवणारी टीम, दिवसभरात झालेल्या कामाचा रिपोर्ट देणारी एक टीम. अशा प्रकारे या कार्यात श्रम विभागणी करुन नेटकेपणा जपण्यात आला आहे.
काम जोखमीचे आणि रोजचे आहे. शिवाय सत्ताधारी पक्षाच्या वतीने ते होत असल्याने आम.हितेंद्र ठाकूर, आम.क्षितीज ठाकूर, ज्येष्ठ नेते व प्रथम महापौर राजीव पाटील,प्रभारी पंकज ठाकूर, किशोर नाईक, जितूभाई शहा, अजय सेठ, हेमंत म्हात्रे हे मान्यवर टीम नालासोपाऱ्याला आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन करीत आहेत.
प्रभाग समिती सभापती अतुल साळुंखे, निलेश देशमुख, नगरसेवक किशोर पाटील,माजी नगरसेवक विजय राणे, अनिल भोगले,प्रकाश पाटील,पक्ष पदाधिकारी नरेंद्र भोईर, नवीन वाघचौडे, नवनाथ पगारे, अजीझ शेख, वरुण वालावलकर, पिंकी राऊत, प्रितम सोनावणे, राजेंद्र लाड, अवधूत लिंगायत, महेंद्र मल्ले, सुनिल परब, कामेश गमरे, ओंकार भोत आदी या आहार वितरण कार्यात परिश्रभ घेत आहेत.
या अत्यावश्यक सेवा उपक्रमाला विरार येथील जीवदानी मंदिर विश्वस्त मंडळ, (ट्रस्ट.) ओम साई धाम साई मंदिर विश्वस्त मंडळ, आणि यंगस्टार्स ट्रस्ट अशा दानशूर संस्थांचे पाठबळ लाभले आहे.
बहुजन विकास आघाडी पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या या मदत कार्याचे कौतुक केले जात आहे.
या सर्व  एक्टिव्हिटीज मधे आहार वितरण यंत्रणा नागरिकांना तोंडावर मास आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम गांभीर्याने पाळावावेत असे आवाहन करते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: