बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम येथील “वार्षिक भंडारा उत्सव” रद्द

वसई : वसई तालुक्यातील तुंगारेश्वर पर्वतावरील परशुराम कुंड येथील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमात प्रतिवर्ष “बालयोगी श्री सदानंद महाराज” यांच्या परशुराम कुंड, तुंगारेश्वर पर्वत येथील आगमन दिन निमित्याने असणारा वार्षिक श्री विष्णू याग तथा “भंडारा” उत्सव जो या वर्षी २८ ते ३० एप्रिल २०२० रोजी होणार होता तो “कोरोनाच्या साथी मुळे” रद्द करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
तरी कृपया कोरोना मुळे शासनाने जाहीर केलेल्या “लॉकडाउन” च्या काळात कोणीही आश्रमात येणंच प्रयत्न करू नये. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे संस्थेच्या वतीने सर्व भक्तांना विनंती करण्यात आली आहे. तसेच कोरोना वायरस विरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेल्या सर्व डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, स्थानिक नगर पालिका, महाराष्ट्र शासन तथा केंद्र शासनाच्या प्रत्नास आश्रम संस्थेद्वारे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!