“बिरसा मुंढा” ची लढाई ; लढला तीच लढाई आता लढण्याची आहे – काकुराम धोदडे 

वसई (प्रतिनिधी) : सदैव अपेक्षेने जगणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांचा इतिहास, स्वाभिमान व शौर्याने भरलेला आहे. इंग्रजाविरुद्ध लढणाऱ्या शाहिद बिरसा मुंढान्चे आम्ही वारस आहोत. शोषण विरुद्ध प्रस्तापित व्यवस्थेविरुद्ध आपल्याला पुन्हा एकदा लढण्यांच आहे. मला “रडणारी माणसे नकोत..लढणारी माणसे हवीत” असे जोशपूर्ण उद्धगार आदिवासी एकता परिषदेचे व भूमिसेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री काकुराम धोडगे यांनी सावन (पाळीपाडा) येथे काढले.
रमेश जाधव यांनी अलीकडेच स्थापन केलेल्या आदिवासी संघर्ष समिती तर्फे वीर बिरसा मुंढा यांच्या जयंतीनिमित्त दि, १७ नोव्हेंबर राजी आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या मशाल प्रजवलन प्रसंगी ते बोलत होते. प्रस्थापित सरकार हे विकासच्या  आदिवासी  विविध मार्गाने पिळवणूक करीत आहे. विविध महा प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्र हे भूमिहीन होणार असल्याचे सांगून आपल्यावरील अन्यायासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्या समवेत उदघाटक म्हणून माजी खा. बळीराम जाधव यांनी आपली दैवत, संस्कृती, सामाजिक अस्मिता याचा अभिमान बाळगा… तीच जतन करा. शिक्षित व्हा, संघटीत व्हा, असे सांगून सांस्कृतिक कलाविष्कार सादर करणाऱ्या कलावंताचा गुणगौरव केला. यावेळी कार्यक्रमास आम. विलास तारे, राजेंद्र पाटील (अध्यक्ष-टी.डी.सी बँक), राजेश परील (मा. सभापती-वसई), अनंत पाटील (सभापती कृ.बा.स भिवंडी), गणेश जाधव (सरपंच सायवन), बाळाराम हरणे (पोलीस पाटील-कलभोण), आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आदिवासी लोकसंस्कृतीतील दैवत, दैनंदिन (प्राचीन) वापरातील वस्तू, विविध हत्यारे, वनौषधी यांचा संग्रह व प्रदर्शन नाथू करप्ट (रा.कलभोण) यांनी सादर केले. भिमा नायक, तंट्या मित्ल यांची वीर गाथा असलेले नृत्य, टिपरीनाच, आदिवासी लोकनृत्ये आदी अनेक कलाविष्कार कलांवंतांनी सादर केले. डॉ.स्वप्नील जाधव यांनी शाहिद बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र कथन केले. पांडुरंग पारधी यांनी पेसा कायद्याचे महत्त्व सांगितले तर राजू पंधरा यांनी पाचव्या अनुसूचीबाबत मार्गदर्शन करताना भूमी हस्तांतरांबाबत माहिती दिली. कॉरीडॉर मार्ग बंदर विकास यामुळे लाखो आदिवासी बांधव भूमिहीन होणार असून जमिनीसाठी सनदशीर मार्गाने लढा देणेस सिद्ध रहावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू पारधी व मॅगाल यांनी केले तर आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश जाधव यांनी यापुढेही असाच भव्य कार्यक्रमाद्वारे आदिवासी संस्कुर्तीचा प्रसार व संवर्धनाकडे लक्ष केंद्रित करण्याचा मानस व्यक्त केला व त्रुजूभावनेने सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करणेस समितेचे सुमारे पाचशे स्वयंसेवक सेवारत राहून कार्यक्रम उत्तम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!