बोईसर भागात नेते राजीव पाटील व अभिनेते प्रदीप कब्रे यांचा प्रचार महाआघाडीला संजीवक

विरार :  पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते प्रदीप कब्रे यांनी या निवडणूक प्रचारात बोईसर परिसरातील उद्योजक, व्यापारी आणि युवक वर्गाशी थेट संवाद साधला.
१४ ते १७ एप्रिल या दरम्यान या दोन नेत्यांनी महाआघाडीला साथ द्यावी आणि बोईसरच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा बळीराम जाधव यांना लोकसभेवर पाठवावे असे आवाहन केले.
बोईसरच्या व्यापारी व युवा कार्यकर्त्यांनी या थेट गाठीभेटी कार्यक्रमाला उस्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे.
अनेक व्यापारी व लघुउद्योगजकांनी नेते राजीव पाटील व प्रदीप कब्रे यांच्याकडे आपल्या अडचणी कथन केल्या. मोदी सरकारने इथला उद्योग कसा अडचणीत आणला आहे आणि परिणामी आपला कामगार व छोटा उद्योजक कसा भरडला जातोय या बाबत चिंता व्यक्त केली.
या संदर्भात ब.वि.आ. नेते राजीव पाटील व प्रदीप कब्रे यांनी आपण या सर्व प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देऊ असे आश्वासन दिले. युवक कार्यकर्ते अनुप संखे (परनाळी ) राहुल जाधव (भीम नगर ) अतुल राऊत (नरपट) सूरज पावडे (नागझरी) दिनेश तरे
(मुरबा ) निखिल पाटील (बोईसर) देवेंद्र राऊत (तारापूर) सर्फराज मुच्छाले, अब्दुलभाई मुच्छाले (चिंचणी) मुस्तकीन शेख ,भुजंग शेट्टी, दत्ता कोरे,रवी पाटील, अनिकेत चुरी,प्रशांत संखे, निकेत राणे ( बोईसर -तारापूर) या युवकांनी या प्रचार दौऱ्यात चांगली साथ दिली.
रिक्षाच आघाडीवर या गाठीभेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना नेते प्रदीप कब्रे म्हणाले की, जर कधी काळी वसई तालुक्यातील परिस्थिती पालघर सारखी होती. आज लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर , राजीव पाटील यांच्या अव्याहत प्रयत्नातून काय झाला आहे बघा वसई तालुका. त्याच धर्तीवर पालघर व जवळच्या क्षेत्राचा विकास होऊ शकतो. आणि या साठीच आपण काम करतो आहोत. या भागातील नागरिकांनी व मतदारांनी साथ दिली तर अवघड व अशक्य असे काय आहे ?
केंद्रात आपले खासदार आणि राज्यात आपले चार पाच आमदार असतील तर पालघर जिल्ह्याचा विकास वेगाने होईल असा विश्वास वाटतो.
यावेळी कोण बाजी मारेल या प्रश्नावर ते म्हणाले, आजही रिक्षा आघाडीवर आहे आणि ही आघाडी पुढेही कायम राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!