बोरिवली नॅशनल पार्कमधील २ हजार आदिवासी व २४,९५९ झोपडपट्टीधारकासाठी म्हाडा घरे बांधणार – मधू चव्हाण

मुंबई (प्रतिनिधी) : बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील २ हजार आदिवासी व २४ हजार९५९ झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा आराखडा म्हाडाने  तयार करून म्हाडाच्या मुंबई मंडळाने त्यासाठी निविदा जारी केल्या आहेत, अशी माहिती मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी आज दिली. यामुळे  नॅशनल पार्कमधील बरेच वर्षे आदिवासी आणि तेथील झोपडपट्टीधारकांचा अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. सुमारे ९० एकर जागेवर आदिवासी आणि झोपडपट्टीधारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सभापती मधू चव्हाण यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि  झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात यापूर्वी आदिवासी व झोपडपट्टीधारकांचे  पुनर्वसन पूर्ण करण्यात आले असून आता दुस-या टप्प्यात नॅशनल पार्कमधील २ हजार आदिवासी आणि  २४ हजार ९५९ झोपडपतिधारकांचे पुनर्वसन करण्यात येईल.
या पुनर्वसनाचे आदेश राज्य सरकारने दिल्याप्रमाणे म्हाडाच्या मुंबई मंडळाने येथील पुनर्विकासाच्या कामाला सुरवात केली. नॅशनल पार्कमधील आदिवासींचे सर्वेक्षण पूर्ण करत, आता तेथील घरांच्या बांधकामासाठी म्हाडाने निबिदा मागविण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती सभापती मधू चव्हाण यांनी दिली.  या निविदानुसार आदिवासींना ६०० चौरस फुटांचे बांधकाम असलेले एक मजली घर बांधून देण्यात येणार आहे. ४३ एकर जागेवर ही घरे बांधली जाणार आहेत तर झोपडधारकांचे पुनर्वसन एसआरए योजनेंतर्गत केले जाणार आहे. त्यासाठी ४७ एकर जमिनीवर त्यांच्यासाठी इमारती बांधल्या जातील. आदिवासी आणि झोपट्टीधारकांसाठी एकूण ९० एकर जागेवर  पुनर्वसनाचे काम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!