बोरिवली पुढे पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये एकही सुसज्ज बंदिस्त नाटयगृह नाही – किशोरी पेडणेकर

वसई (वार्ताहर) : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या बोरिवली शाखेच्या वतीने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या या शिष्टमंडळा अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद महापौरांकडून मिळाला, चांगली चर्चा घडून आली.

मराठी रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके सारे उत्तम घडत असताना तेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, तर राज्य शासन आणि मुंबई महापालिकेच्या वतीने सुध्दा धाडसी पाऊले उचलली जावीत. खुल्या रंगमंच सुविधा वाढविण्यासाची गरज आहे. आणि बंदिस्त नाटय गृहांची निर्मिती झाली तर, व्यावसायिक नाटक, हौशी व प्रायोगिक नाटकांना अधिक वाव मिळेल. मुंबई जवळपास असणाऱ्या मात्र उपनगरात नसलेल्या शहरांची वाढ झपाटयाने झाली आहे. बोरिवली पुढे पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये एकही सुसज्ज बंदिस्त नाटयगृह नाही. शासन,केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आता शेजारच्या महापालिकांना म्हणून एकत्र आणू शकते. आणि असे झाले तर पालघर जिल्ह्यात महापालिकेच्या नाटयगृहांची गरज भागेल. आणि मुंबईतील मराठी रंगभूमीच्या व्यवसायाचा परिघ रुंदावेल. असे विचार ज्येष्ठ अभिनेते आणि बोरिवली शाखेचे पदाधिकारी प्रदीप कबरे यांनी या निमित्ताने व्यक्त केले आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी या शिष्टमंडळाला यथोचित आदर दिला. सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण सुध्दा करुन घेऊन ही भेट संस्मरणीय ठरवली. आपण आपल्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांचा महापालिका गांभीर्यानेविचार करेल असा दिलासा त्यांनी दिला. शाखेच्या वतीने प्रदीप कबरे यांनी महापौरांचे आभार मानले.

नुकतीच मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यालयात ही भेट झाली. दरम्यान प्रत्येक तालुक्यात राज्य शासन एक बहुउद्देशीय खुले नाटयगृह निर्माण करणार या काँग्रेस कार्यकाळात जाहीर करण्यात आलेल्या योजनेचे काय झाले ? आता हा पक्ष राज्यात सत्तेत सहभागी आहे. आणि मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी सांस्कृतिक विकास कार्याला प्राधान्यक्रम विद्यमान मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे हे देतील. असा विश्वास शाखेच्या काही सदस्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: