ब.वि.आ च्या युवा कार्यकर्त्यानी वाचविले महीलेचे प्राण

वसई : १७ डीसेंबरच्या संध्याकाळी आपल्या खेळायला गेलेल्या मुलीला बघण्यासाठी श्रीमती प्रिया प्रदिप चव्हाण डायस परेरा नगर नायगांव पच्छिम मधील महीला दरवाजा उघडुन बाहेर आली तेव्हा पायरीवर असलेल्या घोणस नावाच्या विषारी सापाच्या शेपटीवर तीचा पाय पडला व त्या सापाने तीला पायावर डसले व प़ळायला लागला.
घाबरुन त्या बाईने किंचाळायला सुरुवात केली. तिच्या किंचाळण्याचा आवाज एैकताच मायकल जोसेफ नावाच्या माणसाने तेथे धाव घेतली. त्याने साप चावलाय हे कळताच विभागातील बहुजन विकास आघाडीचे युवानेते आशिष वर्तकला फोन केला. लगेचच आशिष वर्तक घटना स्थळी पोहोचला व त्या महीलेला कार मध्ये घातले व वसई गांव सरकारी हॉस्पीटलकडे वेगाने गाडी वळवली. हॉस्पीटलला पोहोचल्यावर त्या महीलेवर लगेचच उपचार सुरु झाले. त्या महीलेचा उजवा पाय संपुर्ण काळा पडुन सुजला होता. त्यानंतर विषप्रतिकारत इंजेक्शन दिल्यावर त्या ईंजेक्शनचा साईड इफेक्ट त्या महीलेला व्हायला लागला, तिचे हार्ट बिट वाढायला लागली व प्रेशर कमी व्हायला लागले. सरकारी हॉस्पीटलमध्ये आय.सी.यु ची व्यवस्था नसल्याने आशिष वर्तकांनी तिला लगेचच कार्डीवल ग्रेशिअसला हलविले व तीला तेथे आय सी युत एडमिट केले. डॉक्टर पिल्लेतर्फे चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देण्यात आली. त्या महीलेच्या मिस्टरांनी व लहान मुलीने आशिष वर्तकाचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!