ब.वि.आ युवा अध्यक्ष आशिष वर्तक यांनी दाखवली जस्ट डायल विरुद्ध आक्रमकता

युवा अध्यक्ष आशिष वर्तक

वसई : दिनांक ०५ जानेवारी रोजी नायगांव स्थित ७ कॉलेज मधील विध्यार्थी यांनी जमवलेल्या पॉकीट मनीमधुन म्युझिक अल्बम करीता शिमला येथे जावयाचे होते. टीकीट्साठी त्यांनी जस्ट डायल या प्रख्यात कंपनीकडे संपर्क साधून रेल्वेची तिकिटे बुक करण्याकरिता एजंट संदर्भात माहिती मिळवली. उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी भारत टूर्स अँड ट्रेवेल च्या अली या बुकिंग करणाऱ्या व्यक्तीस संपर्क साधून तब्बल २४ हजार रुपयांची टीकीटे बुक केली.
प्रत्यक्ष प्रवासा दिवशी विध्यार्थी हे बोरीवली स्थानकातून अमृतसर ट्रेन मधे चढले. परंतू त्यांच्या साठी राखीव असलेल्या जागेवर अगोदरच काही व्यक्ती बसल्या असल्याने त्यांनी त्यांना या बाबत विचारणा केली. त्यात असे निष्पन्न झाले की सेवेन कॉलेज या विद्यार्थ्यांनी बुकिंग केलेले तिकीट हे बनावट असून त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
ही घटना त्यांनी तात्काळ टीसी यांनी निदर्शनास आणून दिली व तुमची फसवणुक झाली आहे असे सांगितले. तसेच बोरीवली GRP यांनी सदर तक्रार घेण्यास नकार दिला.

एजंट अली

अश्यातच त्यांनी सदर बाब आशिष वर्तक यांना सांगितली. वर्तक यांनी वेळ न दडवता तात्काळ वसई GRP मधे गुन्हा नोंदिवला असुन जस्ट डायलने १० ते १५ हजार शुल्क भरुन रजिस्टर केलेल्या ह्या अली नावाच्या व्यक्तीबद्दल कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्याने केवळ जस्ट डायलच्या निष्काळजीप़णामुळे युवकांची फसवणुक झाली असल्याने ग्राहक न्यायालयात जस्ट डायल विरोधात आवाज उठविणार असल्याची भूमिका घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!