भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांची वैतरणावासीयांमध्ये दहशत

विरार (वार्ताहर) : भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. दि 28 रोजी वैतरणा येथील 7 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. गौरव किशोर पाटील वय 11 (वैतरणा कसराळी), हेमंत बुद्या दिवा वय 7 (दहिसर), दर्शन सत्यवान सापाने वय 2 (वैतरणा फणसपाडा), कैलास विष्णू वैती वय 35 (वैतरणा कसराळी), माळीबाई महादेव पाटील वय 71 (वैतरणा फणसपाडा), मोहन बाबू घरत वय 62 (वैतरणा तलावपाडा), प्रमिला मोहन घरात वय 52 (वैतरणा तलावपाडा).

एआरवी ईंजेक्शन या सात जणांना देण्यात आली व ईम्युनोग्लोबिन ईंजेक्शन करीता यांना मुंबईतील रुग्णालयांमध्ये जाण्याकरता सल्ला दिला होता. वैतरणा डहाणु रेल्वे प्रवासी सेवाभावी संस्थेचे सतीश गावड यांनी आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांना सदर बाब कळवली. मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या व.वि.मनपा रुग्णालयात रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी चौकशी केली असता सदरची ईंजेक्शन तुळींज मनपा रुग्णालयात उपलब्ध आहेत अशी माहिती मिळाली लागलीच त्यांनी सर्व पिडीत रुग्णांना तुळींज हॉस्पिटल येथे येण्यास सांगितले. अधिक चौकशी केली असता तुळींज हॉस्पिटल मध्ये दिवसाला 50-70 कुत्रा चावल्याचा केस उपचारासाठी दाखल होतात. वविमनपा ने मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली आहे परंतु कुणी अश्या प्रकारे वैद्यकीय उपचारांसाठी बळी पडू नये यासाठी ठोस उपाययोजना वविमनपा ने करावी असे मत आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी मांडले व यासंबंधीची सविस्तर निवेदन महापौरांकडे सापविण्यात आली आहे.

वैतरणा विभागात रस्त्यांची अवस्था बिकट आहे तसेच ट्रेन ची व्यवस्था हवी तशी नसल्याने एकंदरीत वाहतुकीची समस्या या भागातील रुग्णांना सोसावी लागत आहे. महानगरपालिका क्षेत्रात वैतरणाचा समावेश करण्यात आला परंतु 10 वर्षे झाली तरी रस्ते सारखी मुबलक सुविधा ही पुर्ण होउ शकली नाही वंचित राहावे लागत आहे अशी दारुण अवस्था वैतरणावासीयांची झाली आहे.

वविमनपा आरोग्य विभागाचे औषध आहेत म्हणून अभिनंदन करावे की भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा पुरेसा बंदोबस्त नाही म्हणून दोष द्यायचा असे श्री सत्यवान सापने (वैतरणा-डहाणु रेल्वे सेवाभावी संस्था) यांनी मत व्यक्त केले.

मोफत आरोग्य सेवेची भीक नको पण कुत्र आवर असे बोलण्याची वेळ सध्या वैतरणावासीयांवर आली आहे असे मत श्री सतीश गावड (वैतरणा-डहाणु रेल्वे प्रवासी सेवाभावी संस्था) यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!