भाजपच्या विघातक धोरणांविरूध्द काँग्रेसचा अभूतपूर्व मोर्चा

वसई (वार्ताहर) : २०१४ मध्ये भारतीय जनतेला भूलथापा देऊन काग्रेसवर भ्रष्टाचाराचे पोकळ आरोप करून सत्ता हस्तगत केलेल्या भाजपाने पुन्हा एकदा दुसऱ्या टर्ममध्ये आपला काळा अध्याय पुढे चालू ठेवला आहे. प्रामूख्याने नोटा बंदीचा चूकीचा निर्णय, जीएसटी संबंधी घेतलेल्या अभ्यासहिन निर्णय, काग्रेस नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे तकलादू आरोप, त्याचबरोबर छोटया उद्योजकांची गळचेपी करतानाच अदानी अंबानी सारख्या संधीसाधू उद्योजकांना हाताशी धरून भाजप सरकारने देशला विनाशाच्या खाईत लोटण्याचे उद्योग आरंभले आहेत. सदर मोर्च्यामध्ये वरील भाष्य करतांना वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील जॉन आल्मेडा ह्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मनमानी आणि दिशाहिन धोरणांवर कडाडून हल्ला चढविला. पुढे बोलतांना ओनील आल्मेडा ह्यांनी मोदी सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या धोरणांवर बोलतांना उल्लेख केला की, मेक-इन-इंडियाचा नारा देणारे सरकार भारतातील प्रकल्पाांसाठी परदेशी उद्योजकांना कॉन्ट्रक्ट देत आहेत हि, विसंगती धोकादायक आहे. त्याचबरोबर गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसग्रेसने काय केले असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी देशाच्या रिझर्व बँकेच्या गंगाजळीतून रू.१० लाख कोटीपैकी ३ लाख उचलण्याची लज्जास्पद गोष्ट केली असून त्यासाठी प्रसंगी मोदी सरकारला रघुराम राजन, उर्जीद पटेल ह्यासारख्या प्रतिभावान गव्हर्नरपदावरून हटविले. तसेच चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाचा विकास दर झपाटयाने १०.५ वरून ५ टक्क्यांवर घसरत चालला आहे. मनरेगा सारख्या लोकाभिमूख प्रकल्पातून सर्व सामान्यांना मिळणारा निश्चित रोजगार भाजपच्या बेताल धोरणांमुळे जागतिक भूखमारीच्या सर्वेमध्ये भारत ११२ क्रमांकापर्यंत घसरला आहे. शेतकरी, लघुउद्योजक, महिला विकास व सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी उपयोगी पडणाऱ्या कर्जांना माफ न करता अदानी, अंबानी, ललीत मोदी ह्यांना खऱ्या अर्थाने देशद्रोही उद्योजकांना हजारो कोटींची कर्जे देऊन परदेशामध्ये पलायन करण्याची वाट दाखवणाऱ्या मोदी सरकारला आपण कुठपर्यंत सहन करणार आहोत अशा उल्लेख ओनील आल्मेडा ह्यांनी केला.

सदर मोर्च्यासाठी विशेष उपस्थित राहिलेले ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव व बि.एम्.संदिप ह्यांनी बोलतांना भाजपने दुसऱ्या टर्मच्या कालावधीमध्ये सुध्दा देशाला पुढे न नेता चुकीची धोरणे राबविण्यामध्ये देश आणखी मागे गेला आहे. हे सांगतांना जी.एस्.टी. करप्रणालीमधील त्रुटी आणि चुकीच्या कार्यपध्दतीमुळे लोकांमध्ये असंतोष आणि लघुउद्योजकांमध्ये असूरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. नोटबंदी बुलेट ट्रेनमुळे देशाची आर्थिक घडी पांगळी झाल्यामुळे लाखो उद्योगधंदे बंद पडून करोडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बिजेपी सरकारच्या देश विघातक धोरणांचा निषेध आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस आता स्वस्थ बसणार नसून देशभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये  निदर्शने, मोर्चे, धरणे आंदोलने करणार असून त्याला अभूतपूर्व प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाकडून दि.१४ डिसेंबर २०१९ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे भारत बचाव रॅलीचे दहा लाखाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांसहीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या महामोर्च्यामध्ये जिल्हा व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन बी.एम्.संदीप ह्यांनी केले आहे.

उल्लेखित धरणे आंदोलनावेळी वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसने वसई तहसिलदार ह्यांना वसईतील विविध समस्यांसंबंधी निवेदन सादर केले आहे. ह्यामध्ये अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ”क्यार” वादळामुळे मच्छिमारांचे झालेले नुकसान महसूल विभागातील नियंत्रण सुटल्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये साधे फेरफार, वारस तक्ते, रेशन वरील धान्य ह्यासारख्या कामांसाठी सर्वसामान्यांना चपला झिजवाव्या लागत आहेत, त्याप्रमाणे अर्नाळा ग्रामपंचायतमधील स्थानीक रहिवाशांना कित्येक वर्ष घरपट्टी लावण्याचे गैरप्रकार चालू आहेत अशा गोष्टींचा निवेदनामध्ये उल्लेख केला आहे. ह्या सर्वसमस्यांवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसने मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!